सर्व 9 खासदार येणार की काही पाठ फिरवणार? राज्यात पुन्हा होणार ऑपरेशन टायगर?

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे खासदार फुटणार असल्याची चर्चा राज्यात पुन्हा एकदा सुरु झालीय... मात्र ही फूट रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंनी एक वेगळीच रणनिती आखलीय... याबाबत मातोश्रीवर खलबतं सुरु असून ही रणनिती नेमकी काय आहे? ठाकरेंच्या रणनितीला यश येणार का? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Uddhav Thackeray chairs a crucial meeting at Matoshree amid rising speculation of ‘Operation Tiger’ and possible MP defections.
Uddhav Thackeray chairs a crucial meeting at Matoshree amid rising speculation of ‘Operation Tiger’ and possible MP defections.saam tv
Published On

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा सत्तेचा मोठा संघर्ष सुरू होण्याची चिन्हं आहेत. दिल्ली आणि पंजाबमध्ये आपचे खासदार, तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्यानंतर आता ठाकरेंचे खासदारही फूटणार असल्याची चर्चा सुरू झालीय. या संभाव्य फुटीला रोखण्यासाठी खुद्द उद्धव ठाकरे आता मैदानात उतरलेत. १४ जूनला त्यांनी लोकसभेच्या सर्व ९ खासदारांची तातडीची बैठक मातोश्रीवर बोलावलीये. मात्र, शिंदे गटाच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने या संभाव्य फुटीवर दाव्यांचे बाण सोडलेत, त्यावरून पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेची ४ वर्षांनी पुन्हा मोठी कसोटी लागणार असल्याचं दिसतंय.

उद्धव ठाकरेंनी बोलावलेली ही बैठक केवळ खासदारांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी असल्याचा दावा संजय राऊत करत आहेत. मात्र, दुसऱ्या बाजूला याच फुटीच्या मुद्द्यावर ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये एकमत नसल्याचं अंबादास दानवेंच्या विधानावरून स्पष्ट होतंय. या दोन्ही नेत्यांचा हा विरोधाभास नेमकं काय सांगतोय.. ते पाहा...

ठाकरेगटानं ऑपरेशन टायगरची हवा काढण्याचा जरी प्रयत्न केला असला तरी गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांमुळे संशयाचा धूर पसरलाय.

12 जून 2026

धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर शिवसेना नेत्यांच्या बैठकीला गैरहजर

19 मे 2026

शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरेंनी घेतली शिंदेगटाचे नेते उदय सामंतांची भेट

18 मे 2026

श्रीकांत शिंदेच्या कार्यक्रमाला नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजेंची उपस्थिती, दोघांमध्ये चर्चा

5 मे 2026

एकनाथ शिंदेंनी संजय दिना पाटील यांची पत्नीच्या प्रकृतीच्या चौकशीसाठी रुग्णालयात घेतली भेट

25 एप्रिल 2026

परभणीचे खासदार संजय जाधव शिवसेना भवनातील खासदांरांच्या बैठकीला गैरहजर

2 एप्रिल 2026

दिल्लीत शिंदेच्या डिनरला नांदेडचे खासदार नागेश आष्टीकर आणि यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख उपस्थित

2022 ला शिवसेना फुटल्यानंतर ठाकरेंचे 18 पैकी 12 खासदार फुटले होते. त्यानंतर ठाकरेंनी पुन्हा लोकसभेचे 9 खासदार निवडून आणले. परंतू आता 4 वर्षांनंतर पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होते की काय, अशी चर्चा सुरू झालीय. कारण, ठाकरे गटाचे ६ ते ७ खासदार फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची जोरदार चर्चा आहे. म्हणूनच रविवारी मातोश्रीवर होणारी बैठक ही केवळ मार्गदर्शनाची बैठक नसून उद्धव ठाकरेंसाठी ती खरी शक्तीपरीक्षा ठरणार आहे. त्यामुळे सर्व खासदार उपस्थिती लावणार की काही जण दांडी मारणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com