मोठी बातमी! LPG सिलेंडरच्या नियमात मोठे बदल! सामान्यांना दिलासा?

एलपीजी सिलेंडरच्या नियमांमध्ये मोठे बदल झाले आहेत. बुकिंगसाठी ठराविक अंतर, OTP डिलिव्हरी आणि e-KYC अनिवार्य करण्यात आले आहे.

New rules for LPG cylinders Latest News : आज एलपीजी सिलेंडरच्या नियमांत मोठे बदल होणार आहेत. गॅस बुकिंगपासून ते डिलिव्हरीपर्यंत अनेक नवीन अटी लागू झाल्या असून, ग्राहकांना आता या नियमांचे पालन करावे लागणार आहे.

आता नवीन गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी ठराविक दिवसांचे अंतर असणे अनिवार्य आहे. शहरात राहणाऱ्या ग्राहकांना २१ ते २५ दिवसांनंतरच नवीन बुकिंग करता येईल. तर ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी हा कालावधी ४५ दिवसांचा असणार आहे. गॅस सिलिंडरची डिलिव्हरी घेताना आता ओटीपी (OTP) देणे बंधनकारक असेल. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी दिल्याशिवाय सिलिंडरची डिलिव्हरी मिळणार नाही. उज्ज्वला योजनेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांसाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. केवायसी पूर्ण नसल्यास गॅस पुरवठ्यात अडथळे येऊ शकतात. तसेच, आंतरराष्ट्रीय तणावामुळे गॅसच्या किमतीतही बदल झाला आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ९९३ रूपयांची वाढ झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com