राज्यात SC प्रवर्गात उपवर्गीकरण लागू? वसतिगृह प्रवेशाच्या जाहीरातीवरुन वाद

Maharashtra SC Sub Categorisation Controversy Nagpur Hostel Admission: राज्यात अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा वाद पुन्हा ऐरणीवर आलाय. नागपूरमधील शासकीय वसतिगृह प्रवेशासाठीच्या जाहिरातीत उपवर्गीकरणावरुन शैक्षणिक संधींमध्ये भेदभाव होत असल्याचा आरोप होतोय. पाहूया एक विशेष रिपोर्ट...
Government hostel admission notice in Nagpur triggers debate over caste-based sub-classification within SC quota in Maharashtra.
Government hostel admission notice in Nagpur triggers debate over caste-based sub-classification within SC quota in Maharashtra.saam tv
Published On

राज्यात एकीकडे आरक्षणावरुन मराठा-ओबीसी आमनेसामने आले असतानाच अनुसूचित जातींच्या 13 टक्के आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा तिढा निर्माण झाला आहे. शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या एक जाहिरातीच्या निमित्ताने उपवर्गीकरणाचा वाद पुन्हा ऐरणीवर आलाय. समाजकल्याण विभागाच्या जाहिरातीत अनुसूचित जाती प्रवर्गातील जागांचे जातीनिहाय स्वतंत्र वर्गीकरण करण्यात आल्याचे समोर आले. जाहिरातीतील मातंग, 'मेहतर' आणि 'इतर एससी' या नोंदींवरून सामाजिक संघटनांनी आक्षेप नोंदवला आहे. तसंच सत्ताधारी आमदारांनीही ही जाहिरात मागे घेण्याची मागणी केलयीय.

नेमका वाद काय?

नागपूर जिल्ह्यातील 25 शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी समाजकल्याण विभागाची जाहिरात

जाहिरातीत SC प्रवर्गाचं स्वतंत्र उपविभाजन

SC प्रवर्गाच्या कॉलममध्ये 'मांग', 'मेहतर' आणि 'इतर एससी' असा उल्लेख

जातनिहाय विभागणी सामाजिक ऐक्याला धक्का देणारी, सामाजिक संघटनांचा आरोप

1984, 2014, 2025च्या शासन निर्णयानुसारच प्रवेश प्रक्रिया, सामाजिक न्याय विभागाचा दावा

तर दुसरीकडे यावरून ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊतांनी भाजपवर घणाघाती आरोप केलेत. जातीजातीत दंगली घडवण्याचा डाव असल्याचा आरोप राऊतांनी केलाय. आरक्षणाचा लाभ सर्व जातींपर्यंत समान पद्धतीने पोहोचवण्यासाठी ‘अ, ब, क, ड’ अशी विभागणी करण्याबाबत न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. मात्र, या प्रस्तावावर विविध समाजांकडून परस्परविरोधी भूमिका घेतल्यामुळे मोठा वाद पेटला आहे. आरक्षणाचा लाभ न मिळालेल्या अतिमागास जातींना प्राधान्य देण्यासाठी उपवर्गीकरणाची शिफारस समितीने केली आहे. मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नसतानाही शासकीय वसतीगृहातील प्रवेशात हे उपवर्गीकरण केल्यामुळे आता या वादाला अधिकृतरित्या तोंड फुटलंय. त्यामुळेच यावर आता सामाजित न्याय खातं काय निर्णय़ घेणार याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com