MBBS प्रवेशाच्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा, बोगस अॅडमिशनच्या रॅकेटचा पर्दाफाश

MBBS Admission Scam Exposed: नीट पेपरफुटीनं संपूर्ण देशात खळबळ माजलेली असताना दुसरीकडे MBBS प्रवेशाच्या नावाखाली एका आरोपीनं कोट्यवधींचा गंडा घातलाय...पुण्यात वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी पालकांची आणि विद्यार्थ्यांची कशी फसवणुक झाली? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Pune Police investigating a major MBBS admission scam where over 40 students were allegedly cheated with fake promises of medical seats.
Pune Police investigating a major MBBS admission scam where over 40 students were allegedly cheated with fake promises of medical seats.saam tv
Published On

आपल्या मुलानं डॉक्टर व्हावं, हे प्रत्येक आई-वडिलांचं स्वप्न असतं...याच स्वप्नाचा गैरफायदा घेत पालकांना कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या एका आंतरराज्यीय महाठगाला पुण्याच्या येरवडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नामांकित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 'एमबीबीएस'ला प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली महाराष्ट्र आणि इतर राज्यातील 40 हून अधिक विद्यार्थ्यांना आरोपीनं कोट्यवधींची फसवणुक केल्याचा प्रकार पुण्यातून समोर आलाय...

नीट' (NEET) परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आरोपी अरविंद आरोगोंडा थेट डॉक्टर बनवण्याचं स्वप्न दाखवायचा...आरोपीने त्याच्या साथीदारांसह हैदराबादमध्ये ‘एडव्हिओ लर्निंग सोल्यूशन्स प्रा. लि.’ नावाची एक बनावट कंपनी स्थापन केली...या कंपनीच्या नावाखाली त्यांनी पुणे आणि मुंबईत 'प्रवेश मार्गदर्शन केंद्र' सुरु केली...सोशल मीडिया आणि ऑनलाइन जाहिरातींच्या माध्यमातून केंद्राची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्यात आली...शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी 5 लाख, तर खाजगी कॉलेजसाठी 3 लाख रुपये फक्त 'समुपदेशन शुल्क' म्हणून पालकांकडून उकळले गेले...मात्र याबदल्या एमबीबीएस प्रवेशाची 'खोटी प्रमाणपत्रं विद्यार्थ्यांना देण्यात आली...

विशेष म्हणजे आरोपी अरविंद आरोगोंडा यानं पुण्यात एका पालकाची सव्वाआठ लाख रुपयांची फसवणूक केल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला...आरोपीविरुद्ध हैदराबाद आणि मुंबई येथे फसवणुकीचे सहा गुन्हे दाखल आहेत. दरम्यान याप्रकरणात मोठ्या रॅकेटचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे...त्यामुळे कोणत्याही शॉर्टकटला किंवा दलालांच्या भूलथापांना बळी पडू नका, असं आवाहन शिक्षणतज्ज्ञांनी केलयं...

नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणं हे जितकं कठीण आहे, तितकंच अशा फसवणुकीपासून स्वतःला वाचवणंही गरजेचं आहे. आरोगोंडा सारखे ठग पालकांच्या भावनांशी खेळून त्यांचे कष्टाचे पैसे लुटतात. त्यामुळे केवळ अधिकृत 'कॅप राउंड' आणि शासकीय प्रक्रियेवरच विश्वास ठेवा, अनोळखी संस्थांना लाखो रुपये देऊन फसवणुकीला बळी पडू नये....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com