

- नागपूरच्या दक्षिण उमरेड वनपरिक्षेत्रातील चनोडा शिवारात एका नर वाघाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ..
- स्थानिक ग्रामस्थांनी घटनेची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृत वाघाच शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आले..त्यानंतर शासकीय नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात आला...
हिंगोलीच्या पहेणी गावात चक्रीवादळ
गावातील 100 ते 150 नागरिकांच्या घरावरील पत्रे उडाले
सुदैवानं नागरिकांचा जीव बचावला
घरावरील पत्रे उडाल्याने घरातील गहू हळद यासह खरिपाच्या पेरणीची तयारी करण्यासाठी आणलेली खते आणि बियाणे भिजली
चक्रीवादळामुळे विद्युत पोल नागरिकांच्या घरावर कोसळले
पुण्यातील स्वारगेट बस स्टॉप वर असलेल्या सगळ्या दुकानांवर टाकली अचानक धाड
आयुक्त तुकाराम मुंडे यांची टीम पुण्यातल्या स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये पाच ते साडेपाचच्या दरम्यान दाखल झाली होती.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत मध्ये वादळी वाऱ्याचा कहर पाहायला मिळाला आहे, शेतकऱ्यांच्या तोडणीला आलेल्या केळीच्या बागा वादळीवाऱ्याच्या तडाख्यामुळे जमीनदोस्त झाल्या आहेत, वर्षभरापासून कष्ट करून सोन्यासारख्या बागा शेतकऱ्यांनी फुलवल्या होत्या मात्र काही मिनिटाच्या वादळी वाऱ्यामुळे होत्याचं नव्हतं झाल आहे, कुरुंदा गिरगाव पारडी, डिग्रस जवळा पांचाळ परिसरात 50 हेक्टर पेक्षा जास्त केळीच्या बागा आता नष्ट झाल्या आहेत, खरिपाच्या पेरणीची तयारी शेतकरी करत असताना आता या भागांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले आहेत
कल्याण पूर्वेतील वालधुनी परिसरातील बुद्धभूमी फाऊंडेशन आणि प्रशासन यांच्यातील जमिनीच्या वादावरून संघर्ष अधिक तीव्र होत असून, फाऊंडेशनचे संचालक भंते गौतमरत्न महाथेरो यांनी १५ जूनपासून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयाजवळ बेमुदत धरणे आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. प्रशासनाकडून केवळ तोंडी आश्वासने दिली जात असून, मागण्यांबाबत लेखी आदेश त्याच प्रमाणे सरकारी जीआर मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.
बालगंधर्व बाहेर नागरिक नाटक पाहण्यासाठी एकवटले
बालगंधर्व च्या आत मध्ये सुरू आहे शोकसभा
शोकसभेला संपायला वेळ लागणार असून याच वेळेत आमने-सामने नाटक होत आहे
अनेक लोक नाटक पाहण्यासाठी या ठिकाणी दाखल झाले आहेत
तिकीट काढून लोक नाटक पाहण्यासाठी बालगंधर्व मध्ये दाखल शोकसभा सुरू असल्याने नागरिक संतप्त
वर्धा जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी
- सुसाट वाऱ्यासह वर्धा जिल्ह्यात पाऊस
- वर्धा, देवळी, आर्वी आणि सेलू तालुक्यात अनेक भागांत पावसाच्या सरी
- मागील दोन दिवसांपासूनच्या उकाड्यामुळे त्रस्त नागरिकांना दिलासा
- पावसामुळे वातावरणात गारवा
- मृग नक्षत्राच्या प्रारंभीही जिल्ह्यात पावसाने लावली होती हजेरी
- आजच्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
- पेरणीपूर्वी किमान 100 मिमी पाऊस होईपर्यंत प्रतीक्षा करण्याचे कृषी विभागाचे आवाहन
ठाकरे गटातील सात खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांवर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संपर्कात असणे म्हणजे पक्षांतर नव्हे, असे त्यांनी स्पष्ट केले. "उद्या माझी आणि Eknath Shinde यांची भेट झाली, तर त्याचा अर्थ मी त्यांच्या पक्षात जातो असा होत नाही," असे दानवे म्हणाले. तसेच, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या मुलाची प्रकृती बिघडल्याने ते कालच्या बैठकीला उपस्थित राहू शकले नसल्याचेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी मोठी जबाबदारी दिली आहे. पीव्हीएसएम, यूवायएसएम, एव्हीएसएम आणि सध्या आर्मी स्टाफचे उपप्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या धीरज सेठ यांना पुढील आर्मी स्टाफ प्रमुख म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.
परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीत तिरंगी लढत
थेट लढत - महायुतीचे उमेदवार सईद खान
महाविकास आघाडीचे उमेदवार विवेक नावंदर
सांगली-सातारा विधान परिषदेच्या महायुतीत नाराजी !
शिवसेनेच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या नेत्यांनी शिंदे सेनेच्या आमदारांची घेतली भेट.
खानापूर विटाचे आमदार सुहास बाबर यांचे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण,मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले,मंत्री जयकुमार गोरे, सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली भेट
विटा येथील बाबर यांच्या घरी जाऊन भाजपा नेत्यांनी सुहास बाबर यांची भेट घेत चर्चा केली आहे.
सांगली पोलीस प्रशासन,हे गुंडांचे माहेरघर बनले आहे,अश्या शब्दात आमदार सदाभाऊ खोत यांनी सांगली पोलिसांचे वाभाडे काढले आहे.सांगली पोलीस हप्तेखोर झालेत,असा गंभीर आरोप देखील आमदार सदाभाऊ खोत यांनी सांगली पोलिसांवर केलाय,जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी आम्ही असुरक्षित असल्याचा अनुभव घेतला आहे.
अमरावती एक्सप्रेस मधील प्रवाशांच्या हातावर मारला फाटका, चोरला मोबाईल
फटका
गँगच्या चोरट्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी ठोकल्या बेड्या,चोरीचा मोबाईल ही हस्तगत
पिंपरी चिंचवड शहरातील आळंदी - देहू रोडवर काल दुपारी एका 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीची छेड काढणाऱ्या आरोपीला नागरिकांनी पकडून दिघी पोलिसांच्या ताब्यात दिल आहे.
परळीच्या मिरवट गावात 15 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. मिलने को आजा, नही तो तेरा बुरा हाल करूंगा अल्पवयीन मुलीला अशी धमकी देण्यात आली. अल्पवयीन मुलीशी घरी जाऊन लज्जास्पद वर्तन परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
नंदुरबारहून गुजरातमध्ये विदेशी दारूची तस्करी करण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला.
गुप्त माहितीच्या आधारे नंदुरबार बसस्थानक परिसरात कारवाई करून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
पुणे-नाशिक महामार्गावरील जेैदवाडी येथे काल अतिशय वेगात जाणाऱ्या एका कारने दुचाकी वाहन चालकाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे., या दुर्घटनेत दुचाकी वाहनाने जाणाऱ्या एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
ठाणे महानगर PNG गॅसची पाईपलाइन भिवंडी कल्याण मार्गावरील बायपास हद्दीत फुटल्याने काही वेळासाठी परिसरात गोंधळ निर्माण झाला होता.
- कृषीमंत्र्यांसमोर शेतकरी एकजूटीचा विजय असो आणि कर्जमाफी आणि विमा मिळालाच पाहिजे अशा दिल्या घोषणा.
- निवेदन देत सरसकट कर्जमाफी करा साहेब तुम्ही हे करू शकता-शेतकरी.
- कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी गाडी थांबवत स्वीकारले निवेदन.
- पराजधानी नागपुरात काही भागात पावसाचे आगमन
- शहरातील काही भागात पावसाच्या सरी बरसल्या
- सकाळपासून उन्हाचा दमट आणि उकाडा होता, मात्र वातावरणात अचानक बदल होऊन पावसाने हजेरी लावली
- पावसाच्या आगमनाने वातावरणात बदल, नागपूरकरांना उन्हापासून काहीसा दिलासा
पिंपरी चिंचवड शहर RTO पासिंग असलेल्या एका लाल परी एसटी महामंडळ बसचे, ग्रामीण भागातील एका बस थांब्यावर जोराच्या वाऱ्याने बसच्या छताच्या बॉडीच पत्रा उडाला पाहायला मिळाल. रस्त्यावरून जाणाऱ्या एका नागरिकांनी आपल्या मोबाईल कॅमेरा मध्ये लाल परी बसच्या बॉडीचा पत्रा हवेत उडत असतानाच चित्रित केला आहे
श्रीक्षेत्र भिमाशंकर मंदिराच्या नव्या सभामंडपाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सभामंडपावरील मुकुटाची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याची माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. यावेळी दीपमाळेचेही पूजन होणार असून १५ जूनपासून मंदिर भाविकांसाठी मर्यादित स्वरूपात खुले करण्यात येणार आहे.
शरद पवार यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करू नये,त्यांनी आमच्यामध्ये यावे,आता निमंत्रण आहेत.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शरद पवारांना दिला आहे.
या आधी शरद पवारांना आपण काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा सल्ला दिला होता,
मावळातील देवालयांमध्येही आता चोरट्यांचा मुक्त संचार सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.
इंदोरी येथील श्री कडजाई माता मंदिरात झालेल्या धाडसी चोरीने पोलिसांच्या सुरक्षाव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
विशेष म्हणजे चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी देवीसमोर हात जोडले, पादत्राणे मंदिराबाहेर काढली आणि त्यानंतर मंदिरातील मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला.
मोफत सोयाबीन बियाणे वाटपादरम्यान आष्टी येथील तालुका कृषी कार्यालयात गोंधळ
बियाणे घेण्यासाठी टोकन न मिळाल्याने शेतकरी आक्रमक.
मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार अमोल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होती
वाशिमच्या फुलउमरी प्रकल्पात पोहण्यासाठी गेलेल्या एका 18 वर्षीय युवकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीये. पुसद येथील 5 तरुण,तरुणी पोहण्यासाठी आज सकाळी साडे सहा वाजेच्या दरम्यान फुलउमरी येथील प्रकल्पावर पोहण्यासाठी गेले.
यातील अंश जयस्वाल हा पाण्यात समोर गेला आणि पाण्यात डुबकी मारली आणि तो परत वर आलाच नाही. त्यानंतर त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी घाबरलेल्या अवस्थेत जवळचे गाव गाठले, त्यानंतर मदत कार्य सुरू झालं.
यावर्षीचा मॉन्सून दरम्यान होणारा पाऊस कमी पडेल
पुढील काही दिवस पावसाची शक्यता नाहीच
मॉन्सून ला पुढे सरकण्यासाठी परिस्थती अनुकूल नाही
पूर्व मोसमी पावसावर अवलंबून राहून शेतकऱ्यांनी पेरणी करू नये
महाराष्ट्रात सरासरीपेक्षा पाऊस कमीच राहणार
मान्सून महाराष्ट्रात पुढे सरकण्यासाठी आपल्याला वाट बघावी लागेल
राज्यात दूध भेसळ आणि बनावट दूध व्यवसायाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईमुळे भेसळखोरांवर लगाम बसत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर तालुक्यातील खडकी येथील शेतकऱ्यांनी तुकाराम मुंढे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातल त्यांच्या कामगिरीचा कौतुक केला आहे.
इंदापूर तालुक्यातील भिगवण ग्रामपंचायत च्या माध्यमातून नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे तीन तेरा वाजल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दूषित पाणी नागरिकांना प्यायला मिळत आहे. ग्रामपंचायतच्या वॉटर सप्लायच्या पाण्यातून दुर्गंधीयुक्त गाळ मिश्रित पाणी नागरिकांना पिण्यासाठी मिळत आहे, यामुळे भिगवण मधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून परिणामी गॅस्ट्रो, डायरिया आणि पोटाच्या विकारांचे रुग्ण वाढण्याची शक्यता नागरिकांमध्ये वर्तवली जात आहे, याबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे
सातारा–सांगली विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज साताऱ्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज सातारा दौऱ्यावर असून, पक्षातील दिग्गज नेतेही साताऱ्यात दाखल होत आहेत. त्यामुळे शरद पवार काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
इंदापुर आणि माणगावमध्ये कोकणात जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा
तीन किलो मिटर पर्यंत वाहनांच्या रांगा
उन्हाळी सुट्टी संपून शाळा सुरु होण्याच्या कालावधील शेवटचा विकएन्ड असल्याने कोकणात जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ
मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरी करणाचा पर्यटकांना फटका
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरातील विकासकामांना अंतिम रूप देण्यात येत असून सुरक्षा, गर्दी नियंत्रण आणि दर्शन व्यवस्थेची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. ऑनलाइन नोंदणी, मर्यादित प्रवेश आणि कडक नियोजनामुळे भाविकांना सुकर दर्शनाचा अनुभव देण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे.
माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज पुण्यात सर्व पक्षीय शोकसभेचे आयोजन
शोकसभेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार शरद पवार राहणार उपस्थित
संध्याकाळी ५ वाजता पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिरात शोकसभेचे आयोजन
राज्यातील अनेक नेते शोकसभेले येण्याची शक्यता
वैभववाडी नगरपंचायत प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे आणि रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे सांगुळवाडी येथे एक रिक्षा उलटून अपघात झाला. या अपघातात तिघे जण जखमी झाले असून, या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून जोरदार ‘रास्ता रोको’ आंदोलन केले.या खराब रस्त्यामुळे आतापर्यंत येथे चार अपघात झाले आहेत, मात्र तरीही नगरपंचायत प्रशासनाला जाग आलेली नाही. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांनी यापूर्वी प्रशासनाला लेखी निवेदनही दिले होते, परंतु प्रशासनाने या मागणीकडे सपशेल दुर्लक्ष केले. प्रशासनाच्या याच हलगर्जीपणामुळे आजचा अपघात घडल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला.
राष्ट्रीय अन्न योजनेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळावा, यासाठी बनावट लाभार्थी शोधण्याच्या दृष्टीने शासनाच्या 'मिशन सुधार' मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील २३,५७४ रेशनकार्डाची पडताळणी होणार आहे. यापैकी दुबार असलेली १,५५३ आणि आधार क्रमांक नसलेली अशी ४,१७६ मिळून एकूण ५,७२९ रेशनकार्ड रद्द करण्यात येणार आहेत. तसेच दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ वापरात नसलेली कार्डही रद्द केली जाणार आहेत. त्याचप्रमाणे वार्षिक उत्पन्न, उत्पन्नाचे स्रोत, वाहन आदी निकषांवर उर्वरित रेशनकार्डाची पडताळणी होणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर रेश्मा काळे महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना आपली साथ देणार असून आपला प्रचार ते आता थांबवणार आहे अधिकृतरित्या त्यांनी यावेळी नंदकिशोर महाजन यांना पाठिंबा जाहीर केला असून जळगावतही आता बंड शमणार आहे या संदर्भात रेशमा काळे यांनी अधिक माहिती दिली
चिखली येथील रामकृष्ण परमहंस मौनीबाबा शिक्षण संस्थेच्या विश्वस्तांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनुराधा इंजिनिअरिंग व पॉलिटेक्निक महाविद्यालयांच्या परवानग्यांसाठी सादर करण्यात आलेली काही प्रमाणपत्रे बनावट असल्याचा आरोप असून, त्याआधारे शासनाचा निधी मिळविण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 465, 467, 468, 471 आणि 120-ब अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीनसिंह चौहान करीत आहेत.
विरार पूर्वेतील फुलपाडा परिसरात वीज दुरुस्तीचे काम करताना महावितरणच्या २२ वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू गौरव सुरेश मोरे असे मृत कामगाराचे नाव आहे.
विरारच्या चोरघे टॉवरजवळील वीज खांबावर गुरुवारी दुरुस्तीचे काम सुरू असताना गौरव याला अचानक विजेचा तीव्र धक्का बसला. धक्क्यामुळे तो खांबावरून खाली कोसळून गंभीर जखमी झाला होता.
स्थानिक नागरिक आणि सहकाऱ्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी विरार पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
पाच महिन्यांनंतर १५ जूनपासून श्रीक्षेत्र भिमाशंकर मंदिर भाविकांसाठी खुले होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज भिमाशंकरमध्ये दाखल होत असून विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या कामांचा, सुरक्षा व्यवस्थेचा आणि भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या सुविधांचा सखोल आढावा घेणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.