Hyderabad Dog Attack Video Saamtv
व्हायरल न्यूज

Dog Attack Video: भयानक! घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्यावर भटक्या कुत्र्याचा हल्ला; घटना CCTVत कैद

Hyderabad Dog Attack Video: हैद्राबादमधील दिलसुखनगरमध्ये एका ५ वर्षीय मुलावर भटक्या कुत्र्याने हल्ला चढवला. या भयंकर घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Gangappa Pujari

Dog Attack Viral Video:

 रस्त्यावर मोकाट फिरवणाऱ्या जनावरांमुळे अनेक अपघात झाल्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. अनेकदा मोकाट कुत्र्यांनी, प्राण्यांनी हल्ला केल्याच्याही घडल्या आहेत. असाच काळीज पिळवटून टाकणारा धक्कादायक प्रकार हैद्राबादमधून समोर आला आहे. हैद्राबादमध्ये ५ वर्षीय चिमुकल्यावर भटक्या कुत्र्याने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ही भयंकर घटना सिसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

सोशल मीडियावर (Social Media) आपल्याला अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. कधी भयंकर अपघात, तर कधी मारामारीचे, भांडणाचे व्हिडिओ लक्ष वेधत असतात. काही व्हिडिओ इतके भीषण असतात की पाहणाऱ्याच्या अंगावर काटा उभा राहतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक भयंकर व्हिडिओ व्हायरल होत आहे.

हैद्राबादमधील (Hyderabad) दिलसुखनगरमध्ये एका ५ वर्षीय मुलावर भटक्या कुत्र्याने हल्ला चढवला. कुत्र्याच्या या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी झालायं. अपार्टमेंटसमोर खेळत असताना भटक्या कुत्र्याने चिमुकल्याच्या शरिराचे लचके तोडले. ही भयंकर घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Viral Video News)

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हिडिओमध्ये पाहू शकता की चिमुकला त्याच्या दोन मित्रांसह इमारतीच्या पार्किंगमध्ये खेळत आहे. अचानक एक कुत्रा त्यांच्या दिशेने येताना दिसतो. कुत्रा आल्याचे पाहताच मुले घाबरुन पळून घरात पळतात. मात्र एक चिमुकला पाय अडखळून पडतो, त्याचवेळी कुत्रा त्याचा चावा घेतो . सुदैवाने लोकांनी आरडा- ओरडा केल्याने कुत्रा माघारी फिरतो.

या हल्ल्यामध्ये चिमुकला जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही संपूर्ण घटना सिसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्यात. अशा भटक्या प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी अनेकांनी केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

Sushil Kedia Tweet : महाराष्ट्र जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोपर्यंत...' सुशील केडिया यांचं फडणवीसांना टॅग करत ट्वीट

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

SCROLL FOR NEXT