Jyoti Mourya News: ज्योती मौर्या पुन्हा चर्चेत! शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर तडकाफडकी बदली; काय आहे प्रकरण?

JM Jyoti Mourya News: शेतकऱ्यांच्या तक्रारींमुळे चर्चेत आलेल्या सेमीखेडा साखर कारखान्याच्या जीएम ज्योती मौर्या यांची बदली करण्यात आली आहे. त्यांना साखर कारखान्याच्या लखनौ मुख्यालयात पाठवण्यात आले आहे.
JM Jyoti Mourya News:
JM Jyoti Mourya News:Saamtv
Published On

Jyoti Mourya News:

 उत्तर प्रदेशमधील प्रशासकीय अधिकारी ज्योती मौर्य पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. बरेलीतील देवरानिया येथील गाळप वारंवार थांबल्याने आणि शेतकऱ्यांच्या तक्रारींमुळे चर्चेत आलेल्या सेमीखेडा साखर कारखान्याच्या जीएम ज्योती मौर्या यांची बदली करण्यात आली आहे. त्यांना साखर कारखान्याच्या लखनौ मुख्यालयात पाठवण्यात आले आहे. सेमीखेडा साखर कारखान्याच्या जीएम पदावर सादाब अस्लम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण काय?

पती आलोक मौर्याच्या (Alok Mourya) गंभीर आरोपांनंतर आता सेमीखेडा शुगर मिलच्या जीएम असलेल्या ज्योती मौर्य पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. वारंवार ऊस गाळप बंद केल्याने शेतकरी नाराज झाले होते. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर ज्योती मौर्या यांची तडका फडकी बदली करण्यात आली आहे. जीएम ज्योती मौर्या (Jyoti Mourya) यांची साखर कारखान्याच्या लखनौ मुख्यालयात बदली केली आहे.

सेमीखेडा साखर कारखाना गळीत हंगामाच्या सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. १९ नोव्हेंबरला पाटलाचे पूजन होऊनही साखर कारखान्यात गाळप सुरू होऊ शकले नाही. शेतकऱ्यांनी या प्रकरणी आंदोलनाचा इशारा दिला. यानंतर 28 नोव्हेंबरपासून गाळप सुरू झाले. तरीही गाळप पुर्ण क्षमतेने सुरू झाले नव्हते.

साखर कारखाना वारंवार बंद पडल्याने शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा मुद्दा उपस्थित होत होता. तसेच पैसे देण्यास विलंब, वजन न करणे, ऊसाचा सट्टा बंद अशा बातम्या समोर आल्या होत्या. या संपूर्ण प्रकरणानंतर जीएम ज्योती मौर्या यांची बदली करण्यात आली आहे. नवीन जीएम शनिवारपर्यंत पदभार स्वीकारतील, असे सांगण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com