Viral Wedding Video: कहरचं केला! एकाच मंडपात पठ्ठ्याने ४ तरुणींशी बांधली लग्नगाठ; व्हिडिओ पाहून नेटकरीही चक्रावले

Viral Video: लग्न म्हणजे (Wedding) दोन जिवांची भेट. दोन जिवांची आयुष्यभरासाठी बांधली जाणारी गाठ म्हणजे लग्न. मात्र या व्हायरल व्हिडिओमध्ये एकाचवेळी, एकाच मांडवात चक्क चार मुलींसोबत विवाह गाठ बांधली आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनीही त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.
Viral Wedding Video
Viral Wedding VideoSaamtv
Published On

Viral Wedding Video:

सोशल मीडिया म्हणजे असंख्य व्हिडिओंचा खजिना. दररोज सोशल मीडियावर एकापेक्षा एक भन्नाट अन् तितकेच चक्रावून टाकणारे व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या एका लग्नातील व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ चर्चेत येण्याचे कारण म्हणजे तरुणाने एकाच मंडपात चक्क चार तरुणींशी विवाह केलायं. हा सगळा प्रकार पाहून नेटकरीही चांगलेच हैराण झालेत.

सोशल मीडियावर (Social Media) लग्नातील अनेक व्हिडिओ व्हायरल असतात. कधी नवरा- नवरीच्या जबरदस्त एन्ट्रीची, कधी डान्सची, तर कधी पाहुण्यांमध्ये जुंपलेल्या भांडणांची माध्यमांवर चर्चा पाहायला मिळते. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओने नेटकरीही हादरुन गेलेत. कारण व्हिडिओमध्ये एक तरुण चक्क चार मुलींशी लग्नगाठ बांधताना दिसत आहे.

लग्न म्हणजे (Wedding) दोन जिवांची भेट. दोन जिवांची आयुष्यभरासाठी बांधली जाणारी गाठ म्हणजे लग्न. मात्र या व्हायरल व्हिडिओमध्ये एकाचवेळी, एकाच मांडवात चक्क चार मुलींसोबत विवाह गाठ बांधली आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनीही त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Viral Wedding Video
Farmers Rasta Roko At Samruddhi Mahamarg: हक्काच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी राेखला समृद्धी महामार्ग, वाहतुक खाेळंबली

व्हायरल (Viral Video) होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मंडपामध्ये लग्नाची धामधुम सुरू आहे. एक तरुण त्याच्या होणाऱ्या चार पत्नीसोंबत सात फेरे घेत आहे. लग्न मंडपात जमलेल्या लोकांचाही मोठा उत्साह दिसतोय. हा सगळा प्रकार पाहून नेटकरीही थक्क झालेत. काही जणांनी भावाचं नशिबचं जोरात आहे.. अशा मजेशीर प्रतिक्रिया दिल्यात.

तर काही नेटकऱ्यांनी एवढ्यांना कसं सांभाळणार हा बाबा? असा मनातला प्रश्नही विचारला आहे. थोडक्यात या तरुणाच्या प्रतापाने नेटकरीही चक्रावून गेलेत. हा व्हिडीओ @musafir_vj या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत 61 हजारांपेक्षा जास्त लोकांनी तो पाहिला आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com