- सचिन बनसाेडे
निळवंडे धरणातून (Nilwande Dam) सोडलेले पाणी सिन्नर तालुक्यातील गावांना न देता नगर जिल्ह्यात वळविल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. पाण्याच्या मागणीसाठी आज (शनिवार) शेकडाे शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्ग (Farmers Rasta Roko At Samruddhi Mahamarg) रोखून धरला. यामुळे समृद्धी महामार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली आहे. (Maharashtra News)
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील सायाळे गावाजवळ शेतक-यांनी आंदोलन छेडले आहे. अचानक झालेल्या आंदोलनामुळे समृद्धी महामार्गावरील वाहनचालकांमध्ये गोंधळ उडाला. या रास्ता राेकाेमुळे महामार्गावरील वाहतुक खाेळंबली आहे.
साम टीव्हीशी बाेलताना शेतकरी म्हणाले आमच्या हक्काचे पाणी आम्हांला मिळणे गरजेचे आहे. परंतु अधिका-यांनी आमचे पाणी अन्यत्र वळवले गेले. आम्ही पाणी मिळाल्याशिवाय समृद्धी महामार्गावरुन उठणार नाही असे म्हणत शेतक-यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.