Mathadi Kamgar Sanghatna: घाई गडबडीत माथाडी कामगार विधेयक मंजूर करु नये, 14 डिसेंबरला माथाडी कामगारांचा राज्यव्यापी बंद : नरेंद्र पाटील

हे विधेयक पुन्हा आणण्याचा प्रयत्न केला जाईल अशी भीती कामगार आणि संघटनेला वाटू लागली आहे.
mathadi kamgar sanghatna calls of bandh on 14 december
mathadi kamgar sanghatna calls of bandh on 14 decembersaam tv
Published On

- सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai News :

माथाडी अधिनियम सुधारणा विधेयक क्रमांक 34 मागे घ्यावे या प्रलंबित मागणीसाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी माथाडी कामगार पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. येत्या 14 डिसेंबरला माथाडी कामगारांनी एक दिवसीय लाक्षणिक बंद पुकारुन सरकारला जागे करण्याचा निर्धार केला आहे. त्याबाबतची माहिती आज (साेमवार) माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील (mathadi kamgar leader narendra patil) यांनी नवी मुंबई येथे आयाेजिलेल्या पत्रकार परिषदेत दिली. (Maharashtra News)

नरेंद्र पाटील म्हणाले हे विधेयक आल्यास 80 टक्के माथाडी कायदा मोडीत निघेल. त्यामुळे कामगारांच्या न्याय हक्कावर गदा येईल. आगामी काळात हाेणा-या अधिवेशनात हे विधेयक पुन्हा आणण्याचा प्रयत्न केला जाईल अशी भीती कामगार आणि संघटनेत आहे.

mathadi kamgar sanghatna calls of bandh on 14 december
Pankaja Munde : मुंडेंच्या परळीत उद्या शासन आपल्या दारी, खासदारांची असणार अनुपस्थिती, पंकजांच्या भूमिकेकडे बीडवासियांचे लक्ष

पाटील पुढे म्हणाले हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात बैठक बोलावून माथाडी संघटनांसोबत चर्चा करून निर्णय घ्यावा अशी आमची सर्वांची मागणी आहे. दरम्यान येत्या 14 डिसेंबरला पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये एपीएमसी, बंदरे ,गोदाम, कंपन्या मधील माथाडी कामगार सहभागी हाेणार असून महाराष्ट्रातील सर्व माथाडी संघटना यामध्ये सहभागी होणार आहेत असेही पाटील यांनी नमूद केले.

यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ. बाबा आढाव, आमदार शशिकांत शिंदे (mlc shashikant shinde) यांच्यासह माथाडी कामगार संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हाेते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

mathadi kamgar sanghatna calls of bandh on 14 december
Shetkari Samvad Yatra: शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी किसान काँग्रेसचा 'एल्गार', ४ डिसेंबरपासून नंदुरबार ते नागपूर शेतकरी संवाद यात्रा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com