Viral Stunt Video: शायनिंग मारायला गेला अन् मोये मोये झालं.. स्टंटबाजी करताना भीषण अपघात| VIDEO

Viral Accident Video: व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण भरधाव बाईकवर जीवघेणी स्टंटबाजी करताना दिसत आहे. पण त्याची ही स्टंटबाजी त्याच्याच अंगलट आली. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने या तरुणाचा जोरदार अपघात झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
Viral Accident Video
Viral Accident VideoSaamtv
Published On

Viral Stunt Video:

सध्या तरुणाईला रिल्स काढण्याचे, व्हिडिओ बनवण्याचे प्रचंड वेड लागलयं. सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी, फेमस होण्यासाठी तरुण- तरुणी अनेक स्टंट करत असतात. बऱ्याचदा असे स्टंट जीवावरही बेतू शकतात. अशा जीवघेण्या स्टंटबाजीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. दिल्ली पोलिसांनी अशाच एका भीषण अपघाताचा व्हिडिओ शेअर केला आहे.

सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. सोशल मीडियावर रोज नवनवे व्हिडिओ व्हायरल असतात. कधी जबरदस्त डान्स, कधी मेट्रोत, रेल्वे स्टेशनवर तुफान मारामारी, तर कधी खतरनाक स्टंटबाजीचे व्हिडिओ पाहायला नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. कधी कधी चालू बाईकवर विचित्र कृती करताना तर कधी चक्क तरुणीसोबत गाडीवर रोमान्स केल्याचे प्रकारही समोर येतात.

सध्या सोशल मीडियावर (Social Media) अशाच एका जीवघेण्या स्टंटबाजीचा व्हिडिओ (Stunt Video) व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण भरधाव बाईकवर जीवघेणी स्टंटबाजी करताना दिसत आहे. पण त्याची ही स्टंटबाजी त्याच्याच अंगलट आली. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने या तरुणाचा जोरदार अपघात झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक कर)

Viral Accident Video
Pimpri Chinchwad Fire : आगीत भाजलेल्या आणखी दोघांचा मृत्यू; तळवडे येथील अग्नितांडवात आतापर्यंत ११ मृत्युमुखी

या व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, एक तरुण सुसाट वेगात स्पोर्ट्स बाईकवर फ्रंट व्हिल मारताना दिसत आहे. स्पोर्ट्स बाईकचे पुढचे चाक उचलून तो भयंकर स्टंट करत आहे. मात्र अचानक या तरुणाचे गाडीवरील नियंत्रण सुटते आणि तो जोरात खाली पडतो. हा अपघात इतका भीषण आहे की त्याच्या गाडीचे दोन तुकडे झाले. तसेच या अपघातात शायनिंग करायला गेलेल्या तरुणालाही गंभीर दुखापत झाल्याचे दिसत आहे.

दिल्ली पोलिसांनी हा व्हिडिओ शेअर करत सुरक्षितपणे गाडी चालवण्याचा सल्ला दिला आहे. तसेच हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. या स्टंटबाजी करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी नेटकऱ्यांनी केली आहे. (Latest Marathi News)

Viral Accident Video
Mumbai Crime News: बोगस आधारकार्ड, मनी ट्रान्सफर... मुंबईतून ९ बांगलादेशींना अटक, कशी होती मोडस ऑपरेंडी?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com