SRA New Rules 2023: आता SRA सदनिका विकण्यासाठी 10 वर्ष वाट पाहावी लागणार नाही, सरकारने मर्यादा केली कमी

Deadlines for Selling For Selling SRA Flats (December 2023 Latest Update): एसआरएच्या माध्यमातून झोपडीधारक लाभार्थ्यास प्राप्त झालेली विनामूल्य सदनिका कोणत्याही प्रकारे हस्तांतरीत करण्यास 10 वर्षे कालावधीपर्यंत मनाई आहे. ही मर्यादा कमी करून सात वर्षे करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे.
SRA  (Slum Rehabilitation Authority Scheme) New Rules 2023 : Deadline for Selling SRA Flats Has Been Reduced, Find out What the New Deadline
SRA (Slum Rehabilitation Authority Scheme) New Rules 2023 : Deadline for Selling SRA Flats Has Been Reduced, Find out What the New DeadlineSaam Tv
Published On

Slum Rehabilitation Authority New Rules 2023:

एक मोती बातमी समोर आली आहे. झोपडपट्टी प्राधिकरणाच्या माध्यमातून झोपडीधारक लाभार्थ्यास प्राप्त झालेली विनामूल्य सदनिका कोणत्याही प्रकारे हस्तांतरीत करण्यास दहा वर्षे कालावधीपर्यंत मनाई आहे. ही मर्यादा कमी करून सात वर्षे करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे.

गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत सांगितले की, ''ही मर्यादा पाच वर्षापर्यंत कमी करण्याच्या लोकप्रतिनिधींच्या मागणीसंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मांडला जाईल.''  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

SRA  (Slum Rehabilitation Authority Scheme) New Rules 2023 : Deadline for Selling SRA Flats Has Been Reduced, Find out What the New Deadline
Old Pension Scheme: जुन्या पेन्शनबाबत मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द काय होता? कर्मचाऱ्याने सांगितलं!

ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना विधानसभेत मांडली होती. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य योगेश सागर, राम कदम, रवींद्र वायकर, वर्षा गायकवाड, डॉ. भारती लव्हेकर यांनी सहभाग घेतला होता. (Latest Marathi News)

याच मुद्यावर उत्तर देताना मंत्री सावे म्हणाले की, एसआरएच्या इमारती दर्जेदार असाव्यात यासाठी त्या विक्रीकरिता उपलब्ध इमारतींसारख्याच असाव्यात अशी अट घालण्यात येईल. जो विकासक प्रकल्प पूर्ण करणार नसेल अथवा भाडे देत नसेल, त्यासंदर्भात बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल.

SRA  (Slum Rehabilitation Authority Scheme) New Rules 2023 : Deadline for Selling SRA Flats Has Been Reduced, Find out What the New Deadline
Sudhakar Badgujar News: 'सलीम कुत्ताशी माझा संबंध नाही', नितेश राणेंच्या आरोपांवर सुधाकर बडगुजर यांचं स्पष्टीकरण

एसआरएच्या प्रकल्पांसंदर्भात उपस्थित विविध मुद्यावर उत्तर देताना मंत्री सावे म्हणाले की, एसआरएच्या इमारती दर्जेदार असाव्यात यासाठी त्या विक्रीकरिता उपलब्ध इमारतींसारख्याच असाव्यात अशी अट घालण्यात येईल. जो विकासक प्रकल्प पूर्ण करणार नसेल अथवा भाडे देत नसेल, त्यासंदर्भात बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल.

एसआरएच्या सदनिकांमध्ये राहणाऱ्या अनधिकृत व्यक्तींविरूद्ध कारवाई करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या 86,429 सदनिकांच्या सर्वेक्षणामध्ये 10,983 सदनिकांमध्ये अनधिकृत रहिवासी आढळून आले आहेत. तर, उच्च न्यायालयातील याचिकेपूर्वीच्या सर्वेक्षणामध्ये 2581 अनधिकृत रहिवासी आढळून आले आहेत. अशा प्रकरणांमध्ये निष्कासनाची नोटीस बजावण्यात आल्याची माहिती, ही सावे यांनी दिली.

SRA  (Slum Rehabilitation Authority Scheme) New Rules 2023 : Deadline for Selling SRA Flats Has Been Reduced, Find out What the New Deadline
Morning Tips: सकाळी उठल्यानंतर करू नका 'या' चुका, दिवस चांगला जाईल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com