yashasvi jaiswal has chance to score most runs in test series in india in ind vs eng 5th test  twitter
Sports

Yashasvi Jaiswal Record: जयस्वालला ७५ वर्षांपूर्वीचा महारेकॉर्ड मोडून काढण्याची संधी! ठरणार पहिलाच भारतीय फलंदाज

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील सुरुवातीच्या ४ सामन्यांमध्ये युवा फलंदाज यशस्वी जयस्वालची बॅट चांगलीच तळपली आहे.

Ankush Dhavre

Yashasvi Jaiswal News In Marathi:

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील सुरुवातीच्या ४ सामन्यांमध्ये युवा फलंदाज यशस्वी जयस्वालची बॅट चांगलीच तळपली आहे. त्याने या ४ सामन्यांमध्ये फलंदाजी करताना दोन दुहेरी शतकांसह ६५५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने अनेक मोठे रेकॉर्डस् मोडून काढले आहेत. दरम्यान धरमशालेत होणाऱ्या पाचव्या कसोटीतही त्याला आणखी एक मोठा रेकॉर्ड मोडून काढण्याची संधी असणार आहे.

हा मोठा रेकॉर्ड मोडण्याची संधी..

भारतात कसोटी मालिका खेळताना सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड हा वेस्टइंडीजच्या एवर्टन विक्सच्या नावावर आहे. १९४८-४९ मध्ये वेस्टइंडीजचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. त्यावेळी झालेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत एवर्टन विक्स यांनी तुफान फटकेबाजी करत ७७९ धावा केल्या होत्या.

या मालिकेत ते सर्वाधिक धावा करणारे फलंदाज होते. यादरम्यान त्यांनी ४ शतकं देखील झळकावली होती. या भारतात कसोटी मालिका खेळताना कुठल्याही फलंदाजाने केलेल्या सर्वाधिक धावा आहेत. यशस्वी जयस्वालला हा रेकॉर्ड मोडण्यासाठी केवळ १२५ धावांची गरज आहे. या धावा करताच तो भारतात कसोटी मालिका खेळताना सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरेल. (Cricket news in marathi)

धरमशालेत पाडणार धावांचा पाऊस?

जर अंतिम कसोटीतही जयस्वालची बॅट तळपली तर तो हा मोठा रेकॉर्ड मोडून काढू शकतो. या मालिकेतील ४ सामन्यांमध्ये त्याने धावांचा पाऊस पाडत ६५५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने दुहेरी शतकं झळकावली आहेत. मुख्य बाब म्हणजे त्याने जेव्हा जेव्हा शतक पूर्ण केलं. त्यानंतर त्याने दुहेरी शतक देखील यशस्वीरीत्या पूर्ण केलं आहे.

या सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), के.एस. भरत (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT