वुमेन्स प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेत मंगळवारी (५ मार्च) झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने बाजी मारत मुंबई इंडियन्स संघावर २९ धावांनी विजय मिळवला आहे. हा मुंबई इंडियन्सचा या हंगामातील दुसरा पराभव ठरला आहे.
हा सामना जिंकण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्स संघासमोर १९३ धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला अवघ्या १६३ धावा करता आल्या. यासह मुंबईने हा सामना २९ धावांनी गमावला आहे.
मुंबई इंडियन्स संघाकडून धावांचा पाठलाग करताना अमनज्योत कोरने सर्वाधिक ४२ धावांची खेळी केली. तर सलामीवीर फलंदाज हेली मॅथ्युजने २९ धावा चोपल्या. तर इतर फलंदाजांच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, यस्तिका भाटियाने ६, सीवर ब्रंटने ५ आणि हरमनप्रीत कौरने ६ धावा केल्या. शेवटी एस सजनाने २४ धावांची खेळी केली. मात्र ही खेळी संघाला विजय मिळवून देण्यासाठी पुरेशी नव्हती. (Cricket news in marathi)
गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्सची आगेकूच..
मुंबईला पराभूत केल्यानंतर गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्सची स्थिती आणखी मजबूत झाली आहे. ५ सामन्यांमध्ये दिल्लीने ८ गुणांची कमाई केली आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्स संघाचे प्रत्येकी ६-६ गुण आहेत. तर युपी वॉरियर्सचा संघ ४ गुणांसह चौथ्या स्थानी आणि गुजरात जायंट्सचा संघ अजूनही आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे.
मुंबईने जिंकला टॉस..
या सामन्यात मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सकडून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या जेमिमा रॉड्रिग्जने सर्वाधिक ६९ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान तिने ८ चौकार आणि ३ षटकार मारले. यासह कर्णधार मेग लेनिंगने ५३ धावा केल्या. या खेळीच्या बळावर दिल्लीने ४ गडी बाद १९२ धावा केल्या. मात्र या धावांचा मुंबईला यशस्वी पाठलाग करता आला नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.