Yashasvi Jaiswal House: स्वप्न सत्यात उतरलं! यशस्वीने मुंबईत घेतलं ५.४ कोटींचं अलिशान घर -VIDEO

Yashasvi Jaiswal House In Mumbai : यशस्वीने मुबंईत आणखी एक अलिशान घर खरेदी केलं आहे. ज्याची किंमत कोट्यावधींमध्ये आहे.
 Yashasvi jaiswal house
Yashasvi jaiswal housetwitter

Yashasvi Jaiswal House News In Marathi:

यशस्वी जयस्वाल सध्या आपल्या फलंदाजीने धुमाकूळ घालतोय. यशस्वी जयस्वाल क्रिकेटपटू होण्याचं स्वप्न घेऊन उत्तर प्रदेशातील छोट्याश्या गावातून मुंबईत आला. आझाद मैदानावरील टेन्टमध्ये राहिला. त्यानंतर त्याचे प्रशिक्षक ज्वाला सिंग यांनी आपल्या राहत्या घरात आश्रय दिला. त्याला यशस्वी क्रिकेटपटू बनवण्यात ज्वाला सिंग यांचा देखील मोलाचा वाटा राहिला आहे. आता यशस्वीने मुबंईत आणखी एक अलिशान घर खरेदी केलं आहे. ज्याची किंमत कोट्यावधींमध्ये आहे.

यशस्वी जयस्वालचं ड्रीम होम..

यशस्वी जयस्वालने वांद्रेतील बीकेसी परीसरात ५.४ कोटी किमतीचं ११०० स्क्वेअर फुटांचं घर घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्याचा हा अलिशान ३ BHK फ्लॅट विंग ३ मध्ये असून त्याची नोंदणी ७ जानेवारी रोजी करण्यात आली आहे. या डीलची किंमत ४८,४९९ रुपये प्रति स्क्वेअर फुट इतकी आहे. यापूर्वी त्याने ठाण्यात अलिशान ५ BHK फ्लॅट खरेदी केला होता.

 Yashasvi jaiswal house
IND vs ENG 4th Test Match Details: केव्हा, कुठे अन् कधी रंगणार भारत- इंग्लंड चौथा कसोटी सामना?

आझाद मैदानाच्या टेन्टमध्ये राहिला..

यशस्वी जयस्वाल सध्या यशाच्या शिखरावर आहे. मात्र इथे पोहचण्यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली आहे. क्रिकेटपटू व्हायचं म्हणून तो मुंबईत आला होता. काही वर्ष तो आझाद मैदानातील टेन्टमध्ये राहिला. त्याचे आई-वडील उत्तर प्रदेशातील बहोडी गावात राहायचे. त्याने आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेतली. शेवटी प्रशिक्षक ज्वाला सिंग यांनी हिऱ्याच्या खाणीतून जसा हिरा शोधून काढतात तसं यशस्वी जयस्वालला शोधून काढलं. (Cricket news marathi)

 Yashasvi jaiswal house
Sachin Tendulkar Viral Video: सचिन..सचिन! मास्टर ब्लास्टरने विमानात एन्ट्री करताच चाहत्यांनी जल्लोष करत केलं हटके स्वागत- Video

यशस्वी जयस्वाल सध्या भारत -इंग्लंड कसोटी मालिकेत धावांचा पाऊस पाडतोय. त्याने विशाखापट्टनम आणि राजकोट कसोटीत दमदार खेळ करत बॅक टू बॅक दुहेरी शतकं झळकावली. राजकोट कसोटीत त्याने नाबाद २१४ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने १२ षटकार मारले होते. तसेच आयपीएल स्पर्धेत तो राजस्थान रॉयल्स संघाचं प्रतिनिधित्व करतो. अंडर १९ वर्ल्डकप झाल्यानंतर राजस्थान रॉयल्सने २.४ कोटींची बोली लावत त्याला आपल्या संघात स्थान दिलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com