भारताचा मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम करून १० वर्षे उलटून गेली आहेत. मात्र अजूनही त्याचा क्रेझ कमी झालेला नाही. त्याची फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सचिन फलंदाजीला येताच मैदानात सचिन..सचिन नावाचा गजर व्हायचा. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे ज्यात क्रिकेट चाहते विमानात सचिन..सचिनचा गजर करताना दिसून येत आहेत.
सचिन तेंडुलकर सध्या व्हॅकेशन मोडमध्ये आहे. तो आपल्या पत्नीसह फिरायला जाण्यासाठी मैदानात चढला. सचिन याच विमानात चढणार असल्याची माहिती मिळताच चाहत्यांनी एकच जल्लोष केला.
सचिनने विमानात पाय ठेवताच चाहते सचिन.. सचिन ओरडू लागले. क्रिकेटच्या मैदानापासून दूर असलेल्या सचिनला आजही तितकंच प्रेम मिळतंय. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
सचिन तेंडुलकर आपल्या कुटुंबासह काश्मीरला गेला होता. इथे त्याची पत्नी अंजली आणि मुलगी सारा देखील होती. त्याने एका बॅट बनवणाऱ्या कंपनीला भेट दिली. इथे त्याने चाहत्यांची भेट घेत त्यांना ऑटोग्राफही दिले. सचिनला विमानात पाहून चाहत्यांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला. प्रत्येकजण हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपताना दिसून आला. (Cricket news in marathi)
१०० शतकं झळकावणारा फलंदाज..
सचिन तेंडुलकर हा जगातील एकमेव फलंदाज आहे ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतकं झळकावली आहेत. त्याने भारतीय संघासाठी २०० कसोटी सामने ४६० पेक्षा अधिक वनडे सामने खेळले आहेत. त्याच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा आणि सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड आहे.
त्याच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने २०० कसोटी सामन्यांमध्ये १५९२१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ५१ शतकं आणि ६८ अर्धशतकं झळकावली आहेत. तर वनडे कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ४६३ सामन्यांमध्ये १८४२६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ४९ शतकं आणि ९६ अर्धशतकं झळकावली आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.