team india
team indiasaam tv news

IND vs ENG 4th Test Match Details: केव्हा, कुठे अन् कधी रंगणार भारत- इंग्लंड चौथा कसोटी सामना?

India vs England 4th Test, Live Streaming Details: कसोटी मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर भारतीय संघाने पुढील २ सामन्यांमध्ये जोरदार विजय मिळवला आहे.
Published on

Ind vs Eng 4th Test, Live Streaming And Match Details:

कसोटी मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर भारतीय संघाने पुढील २ सामन्यांमध्ये जोरदार विजय मिळवला आहे. राजकोटमध्ये झालेल्या तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाने ४३४ धावांनी विजय मिळवला.

यासह भारतीय संघाने कसोटी मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. मालिकेतील चौथा कसोटी सामना रांचीमध्ये रंगणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ मालिका जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर दुसरीकडे इंग्लंडचा संघ दमदार कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

केव्हा आणि कुठे रंगणार भारत - इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना २३ फेब्रुवारीपासून रांचीतील जेएससीए स्टेडियममध्ये रंगणार आहे.

किती वाजता सुरू होणार भारत - इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना?

भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारा चौथा कसोटी सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी सुरू होईल. तर ९ वाजता सामन्याचं नाणेफेक केलं जाणार आहे. (Cricket news in marathi)

टीव्हीवर कुठे पाहता येईल सामना?

हा कसोटी सामना तुम्ही स्पोर्ट्स १८ वर लाईव्ह पाहू शकता

team india
IND vs ENG 4th Test, Team India Squad: चौथ्या कसोटीतून जसप्रीत बुमराहसह प्रमुख फलंदाज बाहेर! असा आहे संपूर्ण संघ

इथे पाहू शकता फुकटात

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना तुम्हाला फुकटातही पाहता येणार आहे. या सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही जियो सिनेमा ॲपवर लाईव्ह पाहू शकता. तसेच जियो सिनेमाच्या वेबसाईटवर देखील लाईव्ह पाहू शकता.

team india
IND vs ENG 4th Test, Team India Squad: चौथ्या कसोटीतून जसप्रीत बुमराहसह प्रमुख फलंदाज बाहेर! असा आहे संपूर्ण संघ

या सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com