भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा कसोटी सामना २३ फेब्रुवारीपासून रांचीमध्ये रंगणार आहे. राजकोट कसोटीत भारतीय संघाने ४३४ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने कसोटी मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. मालिकेत पिछाडीवर असलेला इंग्लंडचा संघ या मालिकेत कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान चौथ्या कसोटीत इंग्लंडच्या प्लेइंग ११ मध्ये बदल पाहायला मिळू शकतो.
या खेळाडूंचा पत्ता होणार कट?
मालिकेतील चौथा कसोटी सामना रांचीमध्ये रंगणार आहे. या मैदानावरही टर्निंग ट्रॅक पाहायला मिळू शकतो. रांचीची खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल ठरते. त्यामुळे दोन्ही संघांच्या प्लेइंग ११ मध्ये १-१ वेगवान गोलंदाज पाहायला मिळू शकतो. तसेच चौथ्या कसोटीत बेन स्टोक्सही गोलंदाजी करताना दिसून येऊ शकतो. बेन स्टोक्स गोलंदाजी करत असेल तर, इंग्लंडला अतिरिक्त वेगवान गोलंदाजाची गरज भासणार नाही. (Cricket news in marathi)
अँडरसन आणि बेअरस्टो बसणार बाहेर?
इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसनला या मालिकेत आपली छाप सोडता आलेली नाही. तर मध्यक्रमातील मुख्य फलंदाज जॉनी बेअरस्टो देखील पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. त्यामुळे चौथ्या कसोटीत या दोन्ही खेळाडूंचा पत्ता कट होऊ शकतो.
फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर जेम्स अँडरसनऐवजी शोएब बशीरला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते. तर जॉनी बेअरस्टोच्या जागी डॅनियल लॉरेन्सला संघात स्थान दिले जाऊ शकते. या संघात वेगवान गोलंदाज म्हणून मार्क वुड किंवा ओली रॉबिन्सनपैकी एकाला संधी दिली जाऊ शकते.
रांची कसोटीसाठी अशी असू शकते इंग्लंडची प्लेइंग ११:
झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, डॅनियल लॉरेन्स, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), टॉम हार्टले, शोएब बशीर, रेहान अहमद आणि मार्क वुड/ओली रॉबिन्सन.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.