भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचा थरार राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडने आपल्या प्लेइंग ११ ची घोषणा केली आहे.
या संघात त्यांनी एक बदल केला आहे. फिरकी गोलंदाज शोएब बशीरला प्लेइंग ११ मधून बाहेर करण्यात आलं आहे. तर वेगवान गोलंदाज मार्क वुडला कमबॅक करण्याची संधी देण्यात आली आहे. इंग्लंडने यापूर्वी झालेल्या २ कसोटी सामन्यांमध्येही सामन्याच्या एक दिवसापूर्वी प्लेइंग ११ ची घोषणा केली होती.
इंग्लंड क्रिकेट बोर्डच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर याबाबत माहीती शेअर करण्यात आली आहे. या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज मार्क वुडला संघात स्थान दिलं गेलं आहे. वुड हा संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज आहे. त्याचं कमबॅक होत असल्याने इंग्लंडचं गोलंदाजी आक्रमण आणखी मजबूत होणार आहे. तरक फिरकी गोलंदाज शोएब बशीरला विश्रांती दिली गेली आहे. हा कसोटी सामना बेन स्टोक्ससाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण हा त्याच्या कारकिर्दीतील १०० वा सामना असणार आहे. (Cricket news in marathi)
प्लेइंग ११ मधून बशीर बाहेर...
इंग्लंडने या सामन्यातून फिरकी गोलंदाज शोएब बशीरला संघाबाहेर ठेवलं आहे. या सामन्यातही झॅक क्रॉली आणि बेन डकेट ही जोडी डावाची सुरुवात करताना दिसून येईल. तर शानदार फॉर्ममध्ये असलेला ओली पोप चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसून येईल. जॉनी बेअरस्टो आणि बेन फोक्स हे दोघेही या सामन्यात नसणार आहेत.
भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ:
झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड, जेम्स अँडरसन.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.