Yashasvi Jaiswal Sixes: 6,6,6.. राजकोटमध्ये घोंगावलं जयस्वालचं वादळ! अँडरसनच्या बॉलिंगवर ठोकले सलग 3 षटकार

Yashasvi Jaiswal Sixes In James Anderson Over: इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर एका पाठोपाठ एक सलग ३ षटकार मारले. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
yashasvi jaiswal sixes
yashasvi jaiswal sixestwitter
Published On

Yashasvi Jaiswal vs James Anderson:

भारताचा भविष्यातील स्टार फलंदाज यशस्वी जयस्वालने इंग्लंडविरुद्ध चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. राजकोट कसोटीतील चौथ्या दिवशी त्याने १४ चौकार आणि १२ षटकारांच्या साहाय्याने २३६ चेंडूत नाबाद खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर एका पाठोपाठ एक सलग ३ षटकार मारले. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

जेम्स अँडरसन हा इंग्लंडचा सर्वात अनुभवी गोलंदाज आहे. या अनुभवी गोलंदाजासमोर फलंदाजी करताना यशस्वी जयस्वालने सलग ३ चेंडूंवर ३ षटकार मारले. यशस्वी जयस्वालला केवळ ७ कसोटी सामने खेळण्याचा अनुभव आहे. तर दुसरीकडे जेम्स अँडरसनने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ९८२ गडी बाद केले आहेत. (Cricket news in marathi)

जेम्स अँडरसन हा इंग्लंडचा सर्वात अनुभवी गोलंदाज आहे. या अनुभवी गोलंदाजासमोर फलंदाजी करताना यशस्वी जयस्वालने सलग ३ चेंडूंवर ३ षटकार मारले. यशस्वी जयस्वालला केवळ ७ कसोटी सामने खेळण्याचा अनुभव आहे. तर दुसरीकडे जेम्स अँडरसनने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ९८२ गडी बाद केले आहेत.

तर झाले असे की, यशस्वी जयस्वाल फलंदाजी करत असताना इंग्लंडकडून ८५ वे षटक टाकण्यासाठी जेम्स अँडरसन गोलंदाजीला आला होता. या षटकाततील दुसऱ्याच चेंडूवर त्याने लेग साईडच्या दिशेने गगनचुंबी षटकार मारला. त्यानंतर पुढील चेंडूवर त्याने कव्हरच्या वरून खणखणीत षटकार मारला. पुढील तिसऱ्या चेंडूवर त्याने जेम्स अँडरसनच्या डोक्यावरून षटकार मारला. ही आतिषबाजी पाहून स्वतः जेम्स अँडरसनही शॉक झाला.

भारताचा शानदार विजय..

हा कसोटी सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाने इंग्लंडला ५५७ धावांचं आव्हान दिलं होतं. या धावांचा पाठलाग करताना इंग्लडचा डाव अवघ्या १२२ धावांवर संपुष्टात आला. यासह भारतीय संघाने या सामन्यात ४३४ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने कसोटी मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com