World Cup  saam Tv
Sports

World Cup 2023: असलंकाच्या शतकानं उडवली बांगलादेशी गोलंदाजांची दाणादाण! विजयासाठी दिलं २८० धावांचं आव्हान

World Cup 2023: श्रीलंकेच्या फलंदाजांनी बांगलादेशच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली.

Bharat Jadhav

World Cup 2023 Bangladesh vs Sri Lanka:

श्रीलंकेचा फलंदाज चरिथ असलंकाच्या शतकी खेळीने लंकेच्या संघाने २७९ धावा केल्या. बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु हा निर्णय लंकेच्या फलंदाजांनी चुकीचा ठरवत बांगलादेशासमोर धावांचा डोंगर उभा केला. (Latest News)

चरिथ असलंकाने १०८ धावांची खेळ करण्यासाठी ६ चौकार आणि षटकार मारलेत. तर बांगलादेशकडून गोलंदाजी करताना तंजीम हसन साकिबने ३ विकेट घेतले. शोरिफूल इस्लाम आणि शाकिब अल हसन यांना २-२ विकेट मिळाल्यात. त्यानंतर मेंहदी हसन मिराज विकेट घेतली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवर बांगलादेश आणि श्रीलंकेच्या संघात सामना होत आहे. उपात्य फेरीतमध्ये प्रवेश करण्यासाठी लंकेचा संघ प्रयत्न करत आहे तर बांगलादेशच्या क्रिकेट संघाचं वर्ल्ड कपमधून पॅकअप झालंय. पॉइंट टेबलमध्ये टॉप-७ मध्ये राहून चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या पात्रता मिळावी, यासाठी बांगलादेशचा संघ मैदानात उतरतलाय. जे संघ या वर्ल्ड कपच्या पाईंट् टेबलमध्ये टॉप-७ मध्ये असतील त्या संघांना २०२५ मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी थेट तिकिटं मिळणार आहे.

दरम्यान प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेला पहिल्या षटकातच पहिला झटका मिळाला. सलामीवीर कुसल परेरा अवघ्या चार धावा करून बाद झाला. शरीफुल इस्लामने त्याला झेलबाद केले. मुशफिकुर रहीमने डायव्ह करत परेराचा शानदार झेल घेतला. त्यानंतर लंकेला दुसरा झटाक कुसल मेंडिसच्या रुपात लागला.

मेंडिसने ३० चेंडूमध्ये १९ धावा केल्या. त्यावेळी लंकेच्या संघाच्या ६७ धावा होत्या. त्यानंतर ९ धावा झाल्यानंतर म्हणजेच संघाच्या ७६ धावा झाल्या असताना श्रीलंकेच्या संघाला निशंकाच्या रुपात तिसरा झटका मिळाला. त्यानंतर मैथ्यूज टाइम आउटच्या नियमामुळे बाद झाला. लंकेने १३८ धावांवर पाच विकेट गमावले होते. त्यानंतर असलंकाने संघाची स्थिती सुधारली आणि शतकी खेळी केली. असलंकाने १०८ धावा करत संघाला मोठी धावसंख्या मिळवून दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : हितशत्रूंचा धोका अन् अतिधनाचा मोह आवरा; ५ राशींच्या लोकांना घ्यावी लागेल विशेष काळजी

GK: Gen Z आहेत कोण? नेपाळच्या रस्त्यावर तरुणांनी घातला मोठा गोंधळ

Maharashtra Live News Update: हिंजवडीतील खराब रस्त्याविषयी सुप्रिया सुळे यांची परत एकदा एक्स वर पोस्ट करत प्रशासनाची कानउघडणी

Pitru Paksha 2025: पितृपक्षात कपडे विकत घेणे का टाळावे? जाणून घ्या नेमकं कारण

Nepal Protest: नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीविरोधात आंदोलन पेटलं; १८ मृत्यू, २५० पेक्षा जास्त जखमी|VIDEO

SCROLL FOR NEXT