Angelo Mathews Wicket: क्रिकेटविश्वात पहिल्यांदाच असं घडलं! अँजेलो मॅथ्यूज टाईमआऊट; नेमकं काय घडलं अन् काय सांगतो नियम?

Angelo Mathews Wicket Controversy: क्रिकेट विश्वात पहिल्यांदाच असं काहीतरी घडलं आहे.
Angelo Mathews Wicket Controversy:
Angelo Mathews Wicket Controversy:X/PTI
Published On

Angelo Mathews Given Timed Out Wicket Controversy:

बांगलादेश आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील ३८ वा सामना सुरु आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून श्रीलंकेला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिलं. या सामन्यात नवा वाद पेटल्याचे पाहायला मिळाले आहे.

अँजेलो मॅथ्यूज फलंदाजीला आल्यानंतर एकही बॉल न खेळता आऊट होऊन माघारी परतला आहे. त्याच्या विकेटमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

तर झाले असे की, बांगलादेश संघाची गोलंदाजी सुरु असताना २५ वे षटक टाकण्यासाठी शाकीब अल हसन गोलंदाजीला आला होता. या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर शाकीबने सदीरा समरविक्रमाला ४१ धावांवर बाद करत माघारी धाडले.

त्यानंतर अँजेलो मॅथ्यूज फलंदाजीला येणार होता.MCC च्या नियमानूसार अँजेलो मॅथ्यूजला दोन मिनिटांच्या आत मैदानावर यायचं होतं. त्यानंतर तीन मिनिटात त्याला पुढील चेंडूचा सामना करायचा होता. हा चेंडू तो खेळू शकला नाही. त्यामुळे त्याला टाईमआऊट घोषित करण्यात आलं आहे. यासह अँजेलो मॅथ्यूज हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाईमआऊट होणारा जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे.

खरच अँजेलो मॅथ्यूज आऊट होता का?

जेव्हा समरविक्रमा बाद झाला त्यावेळी दोन मिनिटांच्या आत अँजेलो मॅथ्यूज मैदानावर आला होता. तो फलंदाजी करण्यासाठी सज्ज होणार इतक्यात त्याला जाणवलं की, त्याला हेल्मेट बदलून हवं आहे. (Angelo Mathews Wicket Controversy)

त्यामुळे त्याने दुसरं हेल्मेट मागवण्याचा इशारा केला. मात्र त्यावेळी गोलंदाजी करत असलेल्या शाकीब अल हसनने अंपायरकडे टाईमआऊटची मागणी केली. सुरुवातीला अंपायरने फार लक्ष दिलं नाही. मात्र शाकीबने ही मागणी जोर लावून धरली.

शेवटी अंपायरने स्क्वेअर लेग अंपायरसोबत चर्चा केली आणि त्याला टाईमआऊट केलं. जर शाकीब अल हसन आणि बांगलादेशने ही मागणी मागे घेतली असती तर अँजेलो मॅथ्यूज नाबाद राहू शकला असता. (Latest sports updates)

angelo mathews
angelo mathews twitter/icc

वरील फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, अँजेलो मॅथ्यूज अंपायरला आपलं हेल्मेट दाखवताना दिसून येत आहे. त्याच्या हेल्मेटचं क्लिप तुटल्याने तो हेल्मेट बदलून देण्याची मागणी करत होता. इतक्यात शाकीब अल हसनने अंपायरकडे टाईमआऊटची मागणी केली.

काय सांगतो MCC चा नियम.. (What Is Timed Out Law)

फलंदाजाची विकेट गेल्यानंतर किंवा रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर येणाऱ्या पुढील फलंदाजाला पुढील चेंडू खेळण्यासाठी ३ मिनिटांचा वेळ दिला जातो. जर गोलंदाज पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल आणि फलंदाजाने ३ मिनिटाच्या आत चेंडू खेळला नसेल तर फलंदाजाला बाद घोषित केलं जातं. तसेच फलंदाजाला २ मिनिटाच्या आत मैदानावर येणं बंधनकारक आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com