AUS vs PAK: जगात सर्वोत्तम गोलंदाजी म्हणून मिरवणाऱ्या पाकिस्तानची ऑस्ट्रेलियाकडून धुलाई, वॉर्नर-मार्शचा 'शतकी' तडाखा

Australia vs Pakistan: या सामन्यात डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्शने आक्रमक खेळी केल्याचे पाहायला मिळाले आहे.
david warner and mitchell marsh
david warner and mitchell marsh twitter
Published On

IND vs PAK, World Cup 2023:

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेची सुरूवात ऑस्ट्रेलियासाठी एका वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हती. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाला भारतीय संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला होता. मात्र तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दमदार कमबॅक करत श्रीलंकेवर विजय मिळवला. ही दमदार कामगिरी ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरूद्ध देखील सुरू ठेवली आहे.

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील सामना बंगळुरूतील चिन्नस्वामी स्टेडियमवर सुरू आहे. या मैदानावर धावांचा यशस्वी पाठलाग केला जाऊ शकतो. हा रेकॉर्ड पाहचा पाकिस्तानने नाणेफेक जिंकूण प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला .तर ऑस्ट्रेलियाला फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. मात्र हा निर्णय पूर्णपणे फसल्याचं पाहायला मिळालं आहे.

सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा

ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्शची जोडी मैदानावर आली होती. या जोडीने पाकिस्तानी गोलंदाजी आक्रमणाचा धुर काढत २५९ धावांची भागीदारी केली आहे. दोघांनी पहिल्या चेंडूपासून पाकिस्तानी गोलंदाजांवर हल्लाबोल करायला सुरूवात केली.

david warner and mitchell marsh
IND vs BAN, Virat Kohli Record: किंग कोहलीच्या शतकी खेळीनं मोडला श्रीलंकेच्या दिग्गजाचा रेकॉर्ड! सचिनचा 'महारेकॉर्ड' रडारवर

या दोघांची फलंदाजी पाहून असं वाटत होतं की, ही जोडी सर्वच रेकॉर्ड मोडणार. शेवटी शाहीन आफ्रिदीने ही भागीदारी तोडली.

या भागीदारीसह मिचेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नरने ऑस्ट्रेलिया संघासाठी वर्ल्डकप स्पर्धेत डावाची सुरूवात करताना सर्वात मोठी भागीदारी केली आहे.तसेच वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तान संघाविरूद्ध खेळताना ही सर्वात मोठी भागीदारी आहे. (Latest sports updates)

david warner and mitchell marsh
World Cup 2023: विराटला टाकलेला चेंडू अंपायरनं वाइड का दिला नाही? नियम काय सांगतो ? वाचा Explainer

डेव्हिड वॉर्नर अन् मिचेल मार्शचं शतक..

या सामन्यात डेव्हिड वॉर्नरने ८५ चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं. यादरम्यान त्याने ६ षटकार आणि ७ चौकार मारले. तर मिचेल मार्शने पुढच्याच चेंडूवर आपलं शतक पुर्ण केलं. मिचेल मार्श १०८ चेंडूंमध्ये १२१ धावांची खेळी करत माघारी परतला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com