Angelo Mathews Wicket: अँजेलो मॅथ्यूज आऊट होता का? काय सांगतो नियम? वाचा सविस्तर

Timed Out Law Explainer: वाचा काय सांगतो नियम.
Angelo Mathews Wicket Controverdy
Angelo Mathews Wicket ControverdyAngelo Mathews image - twitter
Published On

Angelo Mathews Wicket Controversy:

श्रीलंकेचा फलंदाज अँजेलो मॅथ्यूज हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाईमआऊट होणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील ३८ वा सामना श्रीलंका आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे.

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये सुरु असलेल्या या सामन्यात श्रीलंकेचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला आहे. या सामन्यात अँजेलो मॅथ्यूज फलंदाजीला आला मात्र एकही चेंडू न खेळता माघारी परतला आहे. दरम्यान अँजेलो मॅथ्यूज ज्या नियमामुळे बाद झाला तो नियम काय सांगतो?

काय सांगतो नियम?

फलंदाजाची विकेट गेल्यानंतर किंवा रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर येणाऱ्या पुढील फलंदाजाला पुढील चेंडू खेळण्यासाठी ३ मिनिटांचा वेळ दिला जातो. जर गोलंदाज पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल आणि फलंदाजाने ३ मिनिटाच्या आत चेंडू खेळला नसेल तर फलंदाजाला बाद घोषित केलं जातं. तसेच फलंदाजाला २ मिनिटाच्या आत मैदानावर येणं बंधनकारक आहे. (Latest sports updates)

काय आहे प्रकरण?

सदीरा समरविक्रमा बाद झाल्यानंतर अँजेलो मॅथ्यूज फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला होता. तो मैदानावर आल्यानंतर त्याने दुसरं हेल्मेट मागवण्यासाठी इशारा केला. अँजेलो मॅथ्यूजला मैदानावर येऊन ३ मिनिटे झाली होती. मात्र त्याने एकही चेंडू खेळला नव्हता. हे पाहता विरोधी संघाचा कर्णधार शाकीब अल हसनने अंपायरकडे अपील केली.

Angelo Mathews Wicket Controverdy
IND vs SA: 'आम्हाला आधीच माहीत होतं...', लाजीरवाण्या पराभवानंतर टेम्बा बावुमाच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष

शाकीब अल हसनने अपील केल्यानंतर अँजेलो मॅथ्यूजने अंपायरला आणि शाकीबला तुटलेलं हेल्मेट दाखवलं. मात्र तरीदेखील शाकीब अल हसनने अपील मागे घेतली नाही. शेवटी अंपायरने त्याला आऊट घोषित केलं. यासह तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाईमआऊट होणारा जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे.

Angelo Mathews Wicket Controverdy
World Cup Semi Final: टीम इंडियाचं सेमीफायनलचं ठीकाण बदलणार! समोर आलं मोठं कारण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com