IND vs SA: 'आम्हाला आधीच माहीत होतं...', लाजीरवाण्या पराभवानंतर टेम्बा बावुमाच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष

Temba Bavuma Statement: या सामन्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने लक्षवेधी प्रतिक्रिया दिली आहे.
temba bavuma
temba bavumatwitter
Published On

Temba Bavuma Statement After IND vs SA Match:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी खेळ करत दक्षिण आफ्रिकेवर २४३ धावांनी विजय मिळवला.

आतापर्यंत दमदार खेळ करणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ या सामन्यात भारतीय संघाला कडवी झुंज देईल असं वाटलं होतं. मात्र असं काहीच झालं नाही. या निराशाजनक कामगिरीनंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा निराश झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

हा सामना झाल्यानंतर तो म्हणाला की, ' आम्हाला आव्हान येणार हे माहीत होतं. धावांचा पाठलाग करताना आमच्या समोर काय काय अडचणी येऊ शकतात हे ही आम्हाला माहीत होतं. आज आम्ही चांगलं खेळु शकलो नाही. मुख्यतः फलंदाजीत. खरं सांगू तर गोलंदाजीत सुरुवातीचे १० षटक आमच्यासाठी खूप कठीण होते. त्यानंतर आम्ही कमबॅक केलं. आम्ही विकेट्स घेत होतो मात्र भारतीय फलंदाज भागीदारी करत होते, हे आमच्यासाठी आव्हानात्मक होतं. आम्ही खेळपट्टीनुसार खेळ करू शकलो नाही.' (Latest sports updates)

temba bavuma
World Cup 2023: भारत-दक्षिण आफ्रिकेचा WC सेमीफायनलमध्ये प्रवेश! उर्वरीत ६ संघांनाही प्रवेश करण्याची संधी; पाहा समीकरण

भारतीय संघ ८ पैकी ८ सामने जिंकून १६ गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ १२ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. गुणतालिकेतील टॉप २ संघ आमने सामने आले होते, त्यामुळे दोन्ही संघांमध्ये हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळेल असं वाटलं होतं.

या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ५० षटक अखेर ५ गडी बाद ३२६ धावा केल्या. भारतीय संघाकडून विराट कोहलीने सर्वाधिक १०१ धावांची खेळी केली.

तर श्रेयस अय्यरने ७७ धावांचे योगदान दिले. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या ८३ धावांवर संपुष्टात आला. या सामन्यात भारतीय संघाने २४३ धावांनी विजय मिळवला.

temba bavuma
World Cup: रोहित शर्माला 'या' २८ वर्षीय गोलंदाजानं नेहमीच दिलंय टेन्शन; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा केलंय आऊट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com