World Cup: रोहित शर्माला 'या' २८ वर्षीय गोलंदाजानं नेहमीच दिलंय टेन्शन; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा केलंय आऊट

Rohit sharma : आजच्या दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात रोहित शर्माने २४ चेंडूंवर ४० धावा केल्या.
Rohit sharma
Rohit sharmaSaam Tv yandex
Published On

Rohit sharma World Cup :

वर्ल्ड कप २०२३ चा ३८ वा सामना भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघात होत आहे. हा सामना कोलकता येथील ईडन गार्डनच्या स्टेडिअममध्ये खेळला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि शुबमन गिलने तडाखेबाज फलंदाज करत सामन्याची सुरुवात केली. रोहित शर्माने नेहमीप्रमाणे आक्रमक फलंदाजी केली. परंतु दुर्दैवाने त्याला मोठी खेळी करता आली नाही. (Latest News)

रोहित शर्माने आजच्या दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात २४ चेंडूंवर ४० धावा केल्या. यात ६ चौके आणि २ षटकारांचा समावेश आहे. दमदार खेळी करणाऱ्या रोहित शर्माला आफ्रिकेचा गोलंदाज कसिगो रबाडा यांनी बाद केलं. पण क्रिकेट प्रेमींनो तुम्हाला माहितीये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये याच गोलंदाजाने रोहित शर्माला टेन्शन दिलंय. रबाडाने आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहितला सर्वाधिक वेळा बाद केलंय. आतापर्यंत रबाडाने रोहितला १२ वेळेस बाद केलंय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रोहितला सर्वाधिक वेळा बाद करणारे गोलंदाज

  • १२ वेळा - रबाडा

  • ११ वेळेस - टीम साउदी

  • १० वेळेस - अँजेलो मॅथ्यूज

  • ९ वेळा- नाथन लियोन

  • ८ वेळा - ट्रेंट बोल्ट

दरम्यान रोहित शर्माने परत एकदा भारतीय संघाला दमदार सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी रोहित शर्मा आणि शुबमन गिलने ६२ धावांची भागीदारी केलीय. शुबमन गिलने २४ चेंडूत २३ धावा केल्या. गिलला केशव महाराजने बाद केलं. हे दोन्ही संघ पाईंट्स टेबलमध्ये अव्वलस्थानी आहेत. भारत पहिल्या तर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानी आहे. भारतीय क्रिकेट संघाने लगातर ७ सामने जिंकले आहेत. तर आफ्रिकेच्या संघाने ७ पैकी ६ सामने जिंकले आहेत.

Rohit sharma
New Zealand vs Pakistan: पाकिस्तानची न्यूझीलंडवर मात, फखरच्या खेळीने सेमी फायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा पल्लवीत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com