World Cup 2023: भारत-दक्षिण आफ्रिकेचा WC सेमीफायनलमध्ये प्रवेश! उर्वरीत ६ संघांनाही प्रवेश करण्याची संधी; पाहा समीकरण

World Cup 2023 Semi Final Scenario: अजुनही ६ संघांना वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्याची संधी असणार आहे. पाहा समीकरण.
World Cup-2023
World Cup-2023Saam TV
Published On

World Cup 2023 Semi Final Scenario:

भारतीय संघाने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत दमदार खेळ केला आहे. आतापर्यंत भारतीय संघाने ७ सामने खेळले आहेत. हे ७ सामने जिंकून भारतीय संघ १४ गुणांसह अव्वल स्थानी विराजमान आहे. यासह भारतीय संघाने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान दक्षिण आफ्रिकेनेही वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. उर्वरीत २ स्थानांसाठी ६ संघांमध्ये चुरशीची लढत सुरु आहे.

सध्या गु्णतालिकेत भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे संघ टॉप ४ मध्ये आहेत. भारतीय संघाने श्रीलंकेला पराभूत करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.

भारतीय संघ:

भारतीय संघाने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील ७ सामने जिंकले आहेत. भारतीय संघाने आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान, न्यूझीलंड, श्रीलंका, इंग्लंड आणि बांगलादेशवर विजय मिळवला आहे. भारतीय संघ हा वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा पहिलाच संघ ठरला आहे.

दक्षिण आफ्रिका..

दक्षिण आफ्रिकेचा संघ वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ ठरला आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तान आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात न्यूझीलंडचा २१ धावांनी पराभव झाला आहे. या सामन्याचा निकाल लागताच दक्षिण आफ्रिकेचा संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरला आहे.

ऑस्ट्रेलिया:

ऑस्ट्रेलियाचा संघ वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. १४ गुणासंह ऑस्ट्रेलियाचा संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करु शकतो.ऑस्ट्रेलियाचे आतापर्यंत २ सामने शिल्लक आहेत.

हे दोन्ही सामने जिंकून ऑस्ट्रेलियाचा संघ १४ गुणांसह सेमीफायनलसाठी पात्र ठरु शकतो. जर एखादा सामना गमावला तरीदेखील ऑस्ट्रेलियाचा संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरु शकतो. पुढील २ सामने गमावले तरीदेखील ऑस्ट्रेलियाचा संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरु शकतो. मात्र यासाठी पाकिकस्तान आणि न्यूझीलंडने पुढील २ सामने गमावणं गरजेचं आहे. (Latest sports updates)

World Cup-2023
World Cup 2023 Point Table : ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर पॉइंट्स टेबलचं समीकरण बदललं, पाकिस्तानला मिळणार सेमीफायनलचं तिकीट?

न्यूझीलंड:

न्यूझीलंडला वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी दोन पर्याय असणार आहेत. उर्वरीत एक सामना जिंकून न्यूझीलंडचा संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करु शकतो. या विजयासह न्यूझीलंडचा संघ १० गुणांपर्यंत पोहचेल. १० गुण असताना इतर संघांचा नेट रनरेट न्यूझीलंडपेक्षा कमी असणं गरजेचं असणार आहे. तर हा सामना गमावल्यानंतर ८ गुणांसह देखील न्यूझीलंडचा संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करु शकतो. या प्रकरणातही नेट रन रेट मोलाची भूमिका बजावणार आहे.

पाकिस्तान :

पाकिस्तानचा एक सामना शिल्लक आहे. हा सामना जिंकून पाकिस्तानचा संघ १० गुणांपर्यंत पोहचू शकतो. ऑस्ट्रेलियाचा संघ १० गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाचा एक सामना शिल्लक आहे. हा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाचा संघ १२ गुणांपर्यंत पोहचू शकतो. तर न्यूझीलंडचा संघ १० गुणांपर्यंत पोहचू शकतो. पाकिस्तानचा संघ पुढील सामना जिंकून १० गुणांपर्यंत पोहचू शकतो. त्यामुळे पाकिस्तानला हा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागणार आहे.

World Cup-2023
World Cup 2023: शमी, सिराजला दिला जाणारा बॉल चेक करा; पाकिस्तानी खेळाडूचा अंपायर, BCCI सह ICC वर मोठा आरोप; VIDEO

अफगाणिस्तान :

अफगाणिस्तालाही सेमीफायनलमध्ये जाण्याची सुवर्णसंधी आहे. पुढील २ सामने जिंकून अफगाणिस्तानचा संघ १२ गुणांपर्यंत पोहचू शकतो. अफगाणिस्तानचे पुढील सामने नेदरलँड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांसोबत होणार आहे. यापैकी एक सामना गमावला तरी अफगाणिस्तानचा संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करु शकतो. मात्र त्यासाठी अफगाणिस्तानचा नेट रन रेटचा चांगला असणं गरजेचं आहे.

श्रीलंका:

श्रीलंकेचा संघ वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. जर श्रीलंकेला सेमीफायनलमध्ये जायचं असेल तर, पाकिस्तान,न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानने आपले पुढील सामने गमवावे अशी प्रार्थना करावी लागणार आहे.

नेदरलँड :

नेदरलँडलाही पुढील २ सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागणार आहे. त्यानंतर न्यूझीलंड, पाकिस्तान आणिन अफगाणिस्तानने आपले पुढील सामने गमवावे अशी प्रार्थना देखील करावी लागणार आहे.

बांगलादेश आणि इंग्डंडचा संघ वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com