World Cup 2023: शमी, सिराजला दिला जाणारा बॉल चेक करा; पाकिस्तानी खेळाडूचा अंपायर, BCCI सह ICC वर मोठा आरोप; VIDEO

Hasan Raza On Indian Bowlers: पाकिस्तानच्या माजी खेळाडूने मोठे आरोप केले आहेत.
team india
team indiatwitter
Published On

Hasan Raza Statement On Team India Bowlers:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील ३३ व्या सामन्यात भारत आणि श्रीलंका हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करत श्रीलंकेवर ३०२ धावांनी विजय मिळवला आहे.

भारतीय संघाने दिलेल्या ३५८ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ अवघ्या ५५ धावांवर संपुष्टात आला. या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज चमकले. दरम्यान या सामन्यानंतर पाकिस्तानच्या माजी गोलंदाजाने भारतीय गोलंदाजांवर गंभीर आरोप केले आहेत.

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू हसन रजाने ABN News च्या अँकरसोबत संवाद साधत असताना अंपायर, थर्ड अंपायर, ICC आणि BCCI वर गंभीर आरोप केले आहेत. भारतीय गोलंदाज या स्पर्धेत स्विंग आणि रिव्हर्स स्विंग करुन फलंदाजांची बत्ती गुल करताना दिसून येत आहेत. हसन रजाचं असं म्हणणं आहे की, भारतीय गोलंदाजांना वेगळा चेंडू दिला जात आहे. ज्यावर एक्स्ट्रा लेयर आणि एक्स्ट्रा कोटींग करण्यात आली आहे. (Hasan Raza Statement)

या कार्यक्रमात हसन रजासोबत चर्चा करताना अँकरने विचारलं की, भारतीय गोलंदाजांना स्विंग आणि सीम का मिळतंय? यावर बोलताना तो म्हणाला की, ' मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराहची गोलंदाजी अॅलन डोनाल्डची आठवण करुन देत आहे. यामागचं कारण म्हणजे, त्यांना वेगळ्या प्रकारचा चेंडू दिला जात आहे. यामागे अंपायर, ICC किंवा BCCI चा हात आहे असा आरोपही हसन रजाने केला आहे. (Latest sports updates)

team india
Viral Video: 'कोहली को बॉलिंग दो..'LIVE सामन्यात फॅन्सची मागणी! विराटच्या खास अंदाजाने जिंकले मन,Video

गोलंदाजीसह त्याने DRS वरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्याचं म्हणणं आहे की, असे अनेक निर्णय होते जे भारतीय संघाच्या बाजुने दिले गेले आहेत. तर इतर संघांच्या बाबतीत असे निर्णय देण्यात आलेले नाही.

हा सामना जिंकून भारतीय संघाने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय संघाने या स्पर्धेतील ७ पैकी ७ सामने जिंकले आहेत. १४ गुणांसह भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी विराजमान आहे.

तर दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. भारतीय संघ पुढील सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन हात करताना दिसून येणार आहे. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर रंगणार आहे.

team india
IND vs SL: वानखेडेवर इतिहास घडला! शतक हुकलं पण विराटने सचिनसमोरच तोडला मोठा रेकॉर्ड

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com