IND vs SL: वानखेडेवर इतिहास घडला! शतक हुकलं पण विराटने सचिनसमोरच तोडला मोठा रेकॉर्ड

Virat Kohli Breaks Sachin Tendulkar Record: या सामन्यात विराटने सचिन तेंडुलकरचा
Virat Kohli Breaks Sachin Tendulkar Record
Virat Kohli Breaks Sachin Tendulkar Recordtwitter
Published On

Virat Kohli Breaks Sachin Tendulkar Record:

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये वर्ल्डकप स्पर्धेतील ३३ वा सामना सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघातील अनुभवी फलंदाज विराट कोहलीने इतिहास घडवण्याची संधी होती.

श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात विराट आपल्या वनडे कारकिर्दितील शतक झळकावण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता. मात्र त्याचा हा मोठा विक्रम अवघ्या १२ धावांनी हुकला आहे. त्याचा शतकांचा रेकॉर्ड हुकला असला तरी त्याने सचिनचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

विराटने या सामन्यात ९४ चेंडूंचा सामना करत ८८ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ११ चौकार खेचले. त्याचं शतक अवघ्या १२ धावांनी हुकलं. मात्र याच डावातील ३४ धावा पू्र्ण करताच त्याने सचिन तेंडूलकरचा वनडे क्रिकेटमध्ये एकाच वेळेस सर्वाधिक वेळेस १००० धावा करण्याचा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

या सामन्यात येण्यापू्र्वी विराटने ९६६ धावा केल्या होत्या. तर ३४ धावा पूर्ण करताच त्याने १००० धावांचा पल्ला गाठला आहे.

विराटने केव्हा केल्या आहेत १ हजार धावा?

२०११: ३४ सामने १३८१ धावा (४ शतक आणि १४ अर्धशतक)

२०१२: १७ सामने १०२६ धावा (५ शतक आणि ३ अर्धशतक)

२०१३: ३४ सामने १२६८ धावा(४ शतक ७ अर्धशतक)

२०१४: २१ सामने १०५४ धावा (४ शतक ५ अर्धशतक)

२०१७: २६ सामने १४६० धावा (६ शतक ७ अर्धशतक)

२०१८: १४ सामने १२०२ धावा (६ शतक ३ अर्धशतक)

२०१९: २६ सामने १३७७ (५ शतक ७ अर्धशतक)

२०२३: १०५४ धावा (Latest sports updates)

Virat Kohli Breaks Sachin Tendulkar Record
IND vs SL Records: टीम इंडियाचा हा वाघ श्रीलंकेवर एकटा भारी पडणार! पाहा गोलंदाजांची धडकी भरवणारा रेकॉर्ड

वनडेत सर्वाधिक शतक झळकावणारे फलंदाज.

सचिन तेंडुलकर- ४९ शतक

विराट कोहली - ४८ शतक*

रोहित शर्मा- ३१ शतक

रिकी पाँटिंग- ३१ शतक

सनथ जयसुर्या - २८ शतक

आशिया खंडात खेळताना सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

१२०६७– सचिन तेंडुलकर

८४४८ – सनाथ जयसूर्या

८२४६- कुमार संगकारा

८०००- विराट कोहली

Virat Kohli Breaks Sachin Tendulkar Record
India vs Srilanka : पहिला बॉल चौकार अन् दुसऱ्याच बॉलवर दांडी गुल! रोहितचा स्टम्प उडून पडला ४ फुट लांब

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com