England vs Australia Cricket World Cup:
विश्वचषकाच्या ३६ व्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना सुरू आहे. ऑस्ट्रेलिया प्रथम फलंदाजी करत ४९.३ षटकात सर्वबाद २८६ केल्या. तर इंग्लंडकडून क्रिस वॉक्सने चार गडी बाद केले. तर मार्नसने ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक ७१ धावा केल्या. (Latest Marathi News)
इंग्लंडने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात खराब झाली. क्रिसने हेडला अवघ्या ९ धावांवर बाद केले. एक गडी बाद झाल्याने ऑस्ट्रेलियावर दबाव निर्माण झाला. ऑस्ट्रेलियाने ४ षटकात २४ धावा केल्या.
पुढे डेव्हिड वॉर्नरही स्वस्तात माघारी परतला. डेव्हिडने केवळ १६ धावात १५ धावा केल्या. पहिल्या पॉवरप्लेमध्ये इंग्लंडने चांगली गोलंदाजी केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पहिल्या पॉवरप्लेनंतर स्टीव स्मिथ आणि लाबुशेनने संघाचा डाव सावरला. स्टार खेळाडू स्मिथ आणि मार्नसने १९ षटकात १०० धावा पूर्ण केल्या. पुढे स्मिथ ४२ धावांवर बाद झाला.
मार्नसही ८३ चेंडूत ७१ धावा करून तंबूत परतला. पुढे मार्क वुडही पायचीत झाला. त्यानंतर कॅमरुनने संघाचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. कॅमरुने ५२ चेंडूत ४७ धावा कुटल्या. कॅमरुनचं ३ धावांनी अर्धशतक हुकलं. व्हिलीने कॅमरुनला बाद केलं.
त्यानंतर मार्कस ३५ धावांवर तर पेन्ट १० धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाने ४९.३ षटकात सर्व गडी गमावून २८६ धावा कुटल्या. तर इंग्लंडकडून क्रिसने चार, आदिल-मार्कने प्रत्येकी २-२ गडी बाद केले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.