World Cup 2023 : श्रीलंकेच्या पराभवावर पाकिस्तान क्रिकेट संघ खूश; टीम इंडियाच्या विजयावर पाक का झालाय आनंदी?

World cup : वानखेडे स्टेडिअममध्ये भारतीय संघाने श्रीलंकेला पराभूत केलं. या विजयावर पाकिस्तानी संघ सर्वात जास्त आनंदी आहे, पण का बरं? हे जाणून घेऊ...
World cup
World cup Saam Tv
Published On

Pakistan Team Happy on Team India victory :

आज मुंबईतील वानखेडे स्टेडिअममध्ये भारतीय संघाने श्रीलंकेच्या संघाचा दारूण पराभव केला. या विजयामुळे टीम इंडियाने उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. भारतीय क्रिकेट संघाच्या विजयाने क्रिकेटप्रेमी आनंदी झाले आहेत. परंतु भारतीय चाहत्यांपेक्षा पाकिस्तानी चाहते अधिक आनंदी झाले आहेत. पण का बरं? जाणून घ्या. (Latest News)

भारतीय संघाकडून पराभव झाल्यानंतर श्रीलंकेचं या वर्ल्ड कपमधून पॅकअप झालंय. लंकेचा संघ बाहेर गेल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट संघाचा वर्ल्ड कपमधील प्रतिस्पर्धी कमी झालाय. पण पाकिस्तानला सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि नेदरलँड्सला या संघाशी पाकिस्तान संघाला दोन हात करावे लागणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

न्यूझीलंडविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या मोठ्या विजयामुळे पाकिस्तानचे काम थोडे सोपे झालंय. दरम्यान वर्ल्ड कपमधील साखळी सामन्यांमध्ये पाकिस्तानचा सामना आता न्युझीलंड आणि इंग्लंडशी होणार आहे. पाकिस्तानला या दोन्ही सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. पाकिस्तानला फक्त विजय मिळवून चालणार नाही तर मोठ्या फरकाने हे सामने जिंकावे लागतील

जेणेकरून त्यांचा नेट रन रेट सुधारू शकेल. म्हणजेच काय न्यूझीलंडविरुद्धचा सामना त्यांच्यासाठी उपांत्यपूर्व फेरीसारखा असेल. जर पाकिस्तानने दोन्ही सामने जिंकले तर त्यांचे पाईंट १० होतील. म्हणजेच पाकिस्तानचा उपात्यफेरीत पोहोचण्याचं स्वप्न हे स्वप्न राहून जाईल. त्यामुळे पाकिस्तानच्या संघाचं इतर सामन्यांकडे लक्ष असेल. आणि अशा स्थितीत पाकिस्तान आपले सर्व सामने जिंकून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल. याशिवाय अफगाणिस्तानच्या पराभवासाठीही पाकिस्तानला प्रार्थना करावी लागणार आहे. अफगाणिस्तानचे सध्या ६ गुण आहेत आणि अजून तीन साखळी सामने खेळायचे आहेत. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानने किमान दोन सामने गमावावेत, अशी पाकिस्तानची इच्छा आहे.

पाकिस्तानचा संघा प्रार्थना करेल की ऑस्ट्रेलिया किंवा न्युझीलंड त्यांचे इतर सामन्यात पराभूत होतील. सध्या या दोन्ही संघांनी ४-४ सामने जिंकले आहेत. कोणत्याही संघाने आपले सर्व सामने गमावले तर त्या संघाकडे फक्त ८ गुण शिल्लक राहतील. अशा स्थितीत पाकिस्तान आपले सर्व सामने जिंकून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल.

याशिवाय पाकिस्तानला अफगाणिस्तानचा संघदेखील पराभूत व्हावा असं वाटत आहे. कारण अफगाणिस्तानकडे ६ पाईंट्स आहेत. तर त्यांना अजून ३ साखळी सामने खेळायचे आहेत. यामुळे अफगाणिस्तानच्या संघाने निदान २ सामने गमवावेत,अशी प्रार्थना पाकिस्तानचा संघ करत असेल.

याचबरोबर पाकिस्तानची नजर टीम इंडियावर आहे, भारतीय संघाने श्रीलंकाला परभूत केलं. आता भारतीय संघाने नेदरलँड्सचा पराभव करावा अशी अपेक्षा पाक संघाच्या मनात असेल. जर नेदरलँड्सचा संघा पराभूत झाला तर त्यांचेही या वर्ल्ड कपमधून पॅकअप होईल. म्हणजेच अजून एक पाकिस्तानचा प्रतिस्पर्धी कमी होईल.

World cup
India vs Sri Lanka: टीम इंडियाच्या गोलंदाजांकडून लंकादहन! 302 धावांनी नमवत वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये एन्ट्री

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com