Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी! या जिल्ह्यातील ३ लाख महिला अपात्र; तुमचं नाव आहे का?

Ladki Bahin Yojana Solapur 3 lakh Women Ineligible: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेतून सोलापूरातील ३ लाख महिला अपात्र करण्यात आल्या आहेत.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam tv
Published On
Summary

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी

सोलापूरातील ३ लाख महिला अपात्र

निकषात न बसल्याने महिलांचा लाभ बंद

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट पाहत आहे. दरम्यान, त्याआधी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेतून लाखो महिला अपात्र ठरल्या आहेत. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून लाखो महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. लाभार्थ्यांच्या पडताळणीमध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: धक्कादायक आकडेवारी! तब्बल १ कोटी लाडक्या बहिणी अपात्र, राज्य सरकारकडून नव्या निधीची तरतूद, वाचा महत्त्वाची अपडेट

लाडकी बहीण योजनेत सोलापूरातील ३ लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. या महिलांचे उत्पन् अडीच लाखांपेक्षा जास्त आहे. तसेच एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांनी महिलांनी लाभ घेतला असेल तर त्यांचाही लाभ बंद केला जाणार आहे.

सोलापूरमध्ये सुरुवातीला ११ लाख २० हजार ५६३ महिला लाभाथी होत्या. यानंतर महिलांची पडताळणी करण्यात आली आहे. यात २१ ते ६५ वयोगटातील महिलांनाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापेक्षा जास्त किंवा कमी वयोगटातील महिलांचे लाभ बंद केले आहेत. याचसोबत ईकेवायसी न केलेल्या महिलांचेही लाभ बंद करण्यात आले आहेत.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी! या जिल्ह्यातील २ लाख ८३ हजार महिलांचा लाभ कायमचा बंद

या महिलांना लाभ मिळणारच नाही (Ladki Bahin Yojana These Women Benefit Stopped)

लाडकी बहीण योजनेत ईकेवायसी करण्याची शेवटची संधी ३१ डिसेंबरपर्यंत होती. त्याआधी ज्यांनी केवायसी केले आहे त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. लाखो महिलांनी केवायसी झाली नाही. त्यांना मुदतवाढ मिळेल, अशी आशा होती. मात्र, आता या महिलांचा लाभ बंद झाला आहे. तसेच केवायसीमध्ये दुरुस्ती झाली असेल तर ती सुधारण्याची शेवटची संधी तुमच्याकडे आहे. तुम्ही ३१ मार्चपर्यंत केवायसीत दुरुस्ती करु शकतात.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: खुशखबर! लाडक्या बहिणींना एप्रिलमध्ये मिळणार ₹३०००; या दिवशी जमा होणार पैसे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com