भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सध्या टेस्ट सिरीज खेळवण्यात येतेय. या सिरीजनंतर 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवली जाणार आहे. असं असूनही बीसीसीआयने अजून टीमची घोषणा केलेली नाही. तर दुसरीकडे कर्णधार शुभमन गिल खेळणार की नाही याबाबत संभ्रम कायम आहे.
टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल कोलकाता टेस्टमध्ये रिटायर्ड हर्ट झाला होता. यानंतर आता तो गुवाहाटी टेस्टममधूनही बाहेर झाल्याची माहिती आहे. त्यामुळे मोठा प्रश्न असा आहे की जर गिल वनडे सिरीजतून बाहेर झाला तर टीमचे नेतृत्व कोण करणार? कारण उपकर्णधार श्रेयस अय्यरही वनडे सिरीजमध्ये उपस्थित नसणार आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टेस्ट सामन्यात शुभमन गिलच्या मानेला वेदना झाल्या होत्या, ज्यामुळे त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. तो पुन्हा मैदानावर परतला नाही आणि भारताने तो सामना 30 रन्सने गमावला. गिल दुसऱ्या टेस्टमध्येही खेळणार नसल्याची माहिती समोर येतेय. अशातच त्याचं वनडे सिरीजमध्येही खेळणं कठीण मानलं जातंय. दरम्यान, वनडे टीमचा उपकर्णधार श्रेयस अय्यर आधीच दुखापतीमुळे मैदानापासून दूर आहे.
टीमचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे टीमचा भाग असतील यामध्ये शंका नाही. मात्र गिलच्या अनुपस्थितीत त्या दोघांपैकी कोणताही खेळाडू टीमचं नेतृत्व करेल अशी शक्यता फार कमी आहे. अशा वेळी के एल राहुलच्या नावाची कर्णधार म्हणून मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसतेय.
केएल राहुलने चॅम्पियन्स ट्रॉफीत विकेटकीपिंग केली होती आणि त्याने मधल्या फळीत टीमच्या फलंदाजीचीही धुरा चांगल्या पद्धतीने सांभाळली होती. त्यांने 12 वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यांत कर्णधारपद भूषवलं असून त्यातील भारताने 8 सामने जिंकले आणि 4 गमावले.
30 नोव्हेंबर – JSCA आंतरराष्ट्रीय स्टेडियम, रांची – दुपारी 1:30 पासून
3 डिसेंबर – शहीद वीर नारायण सिंह स्टेडियम, रायपूर – दुपारी 1:30 पासून
6 डिसेंबर – ACA-VDCA स्टेडियम, विशाखापट्टणम – दुपारी 1:30 पासून
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.