Rohit Sharma : पुन्हा कर्णधारपदाची चर्चा सुरू असतानाच रोहित शर्माला आणखी एक धक्का

Rohit Sharma ICC Ranking : रोहित शर्मा पुन्हा कर्णधार होणार अशी चर्चा रंगलीय. त्याचवेळी रोहितच्या कट्टर फॅन्सला थोडं निराश करणारं वृत्त येऊन धडकलं आहे. आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये अव्वल असलेल्या रोहितची घसरण झाली आहे.
रोहित शर्माला आणखी एक धक्का
Rohit Sharma saam tv
Published On
Summary
  • रोहित शर्मा वनडे संघाचा कर्णधार होणार अशी चर्चा

  • दुसरीकडं, वनडे रँकिंगमधील अव्वल स्थान गमावलं

  • रोहित शर्माची आयसीसी क्रमवारीत घसरण

'थोडी खुशी, थोडा गम'...प्रत्येकाच्या आयुष्यात कधी न कधी ते येतच असतं. 'मुंबईचा राजा' असं रोहित शर्माला म्हणणाऱ्या डायहार्ट फॅन्सच्या बाबतीतही असंच काहीसं घडलंय. कारण रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवलं तेव्हा याच फॅन्सला कमालीचं वाईट वाटलं होतं. सोशल मीडियावरच्या व्हिडिओंमध्ये त्या वेदना, दुःख दिसूनही आलं होतं. त्यात काही दिवसांपूर्वी रोहित शर्मा हा पुन्हा वनडे संघाचा कर्णधार होणार अशी शक्यता-अशक्यतांची चर्चा सुरू झाली आणि पुन्हा रोहित शर्माचे फॅन्स आनंदी झाले. तो आनंद फार काळ काही टिकला नाही. कारण अजून तरी कर्णधार केल्याची अधिकृत घोषणा झालीच नाही, त्यात वनडेचा बादशहा असलेल्या रोहितची रँकिंगमध्ये घसरण झालीये.

आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये मोठा उलटफेर झालाय. क्रमवारीत पहिल्या स्थानी असलेला स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार रोहित शर्माची घसरण झालीय. वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा तारा उदयास आला आहे. त्यानं अव्वल स्थान पटकावलं आहे. रोहित आणि पहिल्या स्थानावर गेलेल्या फलंदाजाच्या रेटिंग पॉइंटमध्ये फारसं अंतर नाही. यावेळी रँकिंगमध्ये मोठा उलटफेर झालाय. पाकिस्तानच्या बाबर आझमच्या रँकिंगमध्ये थोडी सुधारणा झाली आहे.

डेरिल मिचेल अव्वल स्थानी

न्यूझीलंडचा स्टार फलंदाज डेरिल मिचेल आता आयसीसी वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे. दोन स्थानांनी झेप घेत पहिल्या स्थानी विराजमान झाला आहे. मिचेल यानं वेस्ट इंडीजच्या विरोधात वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात तडाखेबंद शतक झळकावलं आहे. त्यानं ११९ धावांची खेळी केली. त्याचा फायदा त्याला रँकिंगमध्ये झालाय. ७८२ गुणांसह तो पहिल्या स्थानी पोहोचलाय. ही त्याची उच्चांकी रेटिंग आहे. तो पहिल्यांदाच वनडे रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी पोहोचलाय.

रोहित शर्मा दुसऱ्या स्थानी

रोहित शर्माच्या क्रमवारीत एका स्थानाची घसरण झालीय. आता तो दुसऱ्या स्थानी पोहोचलाय. रोहित शर्माचे ७८१ अंक आहेत. डेरिल मिचेल आणि रोहितच्या रेटिंग पॉइंटमध्ये फक्त एका अंकाचा फरक आहे. पुढील क्रमवारी जाहीर होईपर्यंत त्यात पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तानचा इब्राहिम जादरान याच्याही रँकिंगमध्ये एका स्थानाची घसरण झालीय. ७६४ गुणांसह तो तिसऱ्या स्थानी घसरलाय. शुभमन गिल अजूनही चौथ्या आणि विराट कोहली पाचव्या स्थानी आहे.

रोहित शर्माला आणखी एक धक्का
Rohit Sharma: वनडे क्रिकेटबाबत BCCIची रोहित शर्माला ताकीद; वॉर्निगनंतर 'हिट-मॅन'चा मोठा निर्णय

बाबर आझमला फायदा

पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम हा देखील क्रमवारीत एक पायरी वर गेलाय. तो सहाव्या क्रमांकावर आहे. आयर्लंडचा हॅरी टॅक्टरनं देखील एका स्थानानं झेप घेतली आहे. ७०८ अंकांसह तो सातव्या स्थानी आहे. भारताचा श्रेयस अय्यर आता ७०० रेटिंग पॉइंटसह आठव्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेचा चरित असलंकाची तीन स्थानांनी घसरण झालीय. तो नवव्या स्थानी आहे. तर शे होप दहाव्या स्थानी कायम आहे.

रोहित शर्माला आणखी एक धक्का
Rohit Sharma : मोठी बातमी ! रोहित शर्मा कर्णधार होणार; 'दुर्लक्षित' फलंदाजाला मिळू शकते टीम इंडियात संधी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com