Rohit Sharma: वनडे क्रिकेटबाबत BCCIची रोहित शर्माला ताकीद; वॉर्निगनंतर 'हिट-मॅन'चा मोठा निर्णय

BCCI Issues Fresh Warning to Rohit Sharma: कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्माला बीसीसीआयनं एक नवीन ताकीद दिलीय. भारतीय एकदिवसीय संघात स्थान टिकवून ठेवायचे असेल तर स्थानिक क्रिकेटमधून रोहितला त्याचा फॉर्म आणि फिटनेस सिद्ध करावा लागेल.
rohit sharma
BCCI warns Rohit Sharma over ODI form and fitness; told to play domestic cricket for selection.google
Published On
Summary
  • BCCI ने रोहित शर्माला वनडे क्रिकेटसाठी फॉर्म आणि फिटनेस राखण्याची वॉर्निंग दिली.

  • रोहित शर्माने याआधी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय.

  • बीसीसीआयच्या कठोर भूमिकेमुळे रोहित शर्मावर दबाव वाढलाय.

बीसीसीआयनं भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू रोहित शर्माला एकदिवशीय सामन्याबाबत ताकीद दिलीय. बीसीसीआयकडून आलेल्या वॉर्निंगनंतर रोहित शर्मानं मोठा निर्णय घेतलाय. याआधी बीसीसीआयनं कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्माकडून काढून घेतली होती. त्यानंतर रोहितनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. आता बीसीआयनं एकदिवसीय सामन्यांबाबत सक्त ताकीद दिलीय.

बीसीसीआयने दिलेल्या ताकदीनंतर रोहित शर्माला आपल्या फीटनेस आणि खेळावर अधिक लक्ष घालावे लागेल. तसेच स्थानिक क्रिकेटमध्ये खेळावं लागणार आहे. जर भारताकडून वनडे क्रिकेट खेळायचे असेल तर तुझा फॉर्म आणि फिटनेस चांगला असला पाहिजे. तू आता फक्त वनडे क्रिकेटच खेळतो. त्यामुळे जर फॉर्म, फिटनेसच्या जोरावर संघात स्थान मिळवायचे असेल तर तुला स्थानिक क्रिकेट खेळावे लागेन. जर स्थानिक क्रिकेट खेळले नाही तर भारताच्या वनडे संघात स्थान मिळेल की नाही, याबाबत आम्ही काहीही सांगू शकत नाही, असं बीसीसीआयकडून रोहितला सांगण्यात आलंय.

rohit sharma
Rohit Sharma: 'आज मेरे यार की शादी है’ वर रोहितचा भन्नाट डान्स; नवरा-नवरी आश्चर्यचकीत, Video Viral

दरम्यान रोहित शर्माला बीसीसीआयने दुसऱ्यांदा वॉर्निंग दिलीय. याआधी यापूर्वी रोहित शर्माने कसोटी क्रिकेटबाबत जेव्हा वॉर्निंग मिळाली होती तेव्हा त्याने निवृत्तीच पत्कारली होती. आता रोहित शर्माला वनडे क्रिकेटबाबत वॉर्निंग मिळाली आहे. आताही त्याने एक मोठा निर्णय घेतलाय.

rohit sharma
ICC Women World Cup: वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियावर पैशांचा वर्षाव; भारताला अन् उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेला किती मिळणार पैसा?

बीसीसीआयच्या ताकीदनंतर रोहितनं कळवलं की, तो स्थानिक क्रिकेट खेळण्यास उपलब्ध आहे. विजय हझारे ट्रॉफी खेळण्यासाठी तो उपलब्ध आहे. रोहित शर्माने आता बीसीसीआयच्या वॉर्निंगनंतर स्थानिक क्रिकेट खेळण्याचा मोठा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता रोहित शर्मा येत्या काही दिवसांत आपला फॉर्म आणि फिटनेस कसा राखतो, हे पाहावं लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com