

भारतीय महिला संघाला बंपर बक्षीस रक्कम देण्यात आलीय.
ऑस्ट्रेलियाला मिळालेल्या १.३२ दशलक्ष डॉलर्सपेक्षा २३९ टक्क्यांनी जास्त आहे.
भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच महिला विश्वचषक जिंकलाय.
आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्ड कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव केला. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीत हा सामना खेळवण्यात आला. अंतिम सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेसमोर २९९ धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाच्या नाकीनऊ आले. आफ्रिकेचा संघ ४५.३ षटकांत २४६ धावांवर गारद झाला. भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच विश्वचषक जिंकलाय.
पहिल्यांदा महिला संघानं एकदिवसीय वर्ल्ड कप जिंकलाय. वर्ल्ड चॅम्पियन झालेल्या भारतीय संघाला ४.४८ दशलक्ष डॉलर्स (अंदाजे ४० कोटी रुपये) बक्षीस रक्कम मिळेल. ही रक्कम २०२२ मध्ये वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या ऑस्ट्रेलियाला मिळालेल्या १.३२ दशलक्ष डॉलर्सपेक्षा २३९ टक्क्यांनी जास्त आहे.
तर वर्ल्ड कपमध्ये उपविजेत्या ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेलाही मोठी रक्कम मिळाली आहे. लॉरा वोल्वार्डच्या नेतृत्वाखालील संघाला २.२४ दशलक्ष डॉलर (अंदाजे २० कोटी रुपये) मिळणार आहेत. ही रक्कम २०२२ च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमधील उपविजेत्या इंग्लंडला मिळालेल्या ६००,००० डॉलरपेक्षा २७३ टक्क्यांनी जास्त आहे.
उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन संघांना समान रक्कम १.१२ दशलक्ष डॉलर (अंदाजे ९.३ कोटी रुपये) मिळाली आहेत. तर गेल्या एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांना ३००,००० डॉलर रुपये मिळाले होते. तर पॉइंट टेबलमध्ये पाचव्या आणि सहाव्या स्थानावर असलेल्या श्रीलंका आणि न्यूझीलंड या संघांना समान रक्कम ७००,००० दशलक्ष डॉलर (सुमारे ५.८ कोटी रुपये) देण्यात आले होते.
तसेच सातव्या आणि आठव्या स्थानावर असलेल्या बांगलादेश आणि पाकिस्तानलाही भरघोस रक्कम मिळाली आहे. बांगलादेश आणि पाकिस्तानला प्रत्येकी २८०,००० दशलक्ष डॉलर (अंदाजे ₹२.३ कोटी) मिळाले आहेत. इतकेच नाही तर २०२५ च्या महिला क्रिकेट विश्वचषकात सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाला आयसीसी (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) कडून २,५०,००० लाख डॉलर (सुमारे २ कोटी रुपये) ची हमी रक्कम देण्यात आली होती. तसेच प्रत्येक सामना जिंकण्यासाठी संघांना अतिरिक्त ३४,३१४ डॉलर (अंदाजे 28 लाख रुपये) देण्यात आलेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.