

शेफाली वर्मानं अंतिम सामन्यात जबरदस्त खेळी केली.
भारताला विश्वचषक अंतिम सामन्यात मजबूत स्थिती मिळाली.
खराब फॉर्मनंतर पुनरागमन करत तिनं टीम इंडियासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलं.
महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होतोय. दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत जबरदस्त कामगिरी केली आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला हरवलंय, तर दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला हरवल्यानंतर हे संघ आता अंतिम सामन्यात भिडले आहेत.
या सामन्यात लेडी सेहवाग म्हणून ओळख मिळवलेल्या शेफालीनं जबरदस्त खेळी केली. काही दिवसांपासून ऑट ऑफ फॉर्म असलेल्या शेफालीनं कमाल केली. मात्र तिचं शतक हुकलं. दरम्यान धुवॉधार फलंदाजी करत तिने ८७ धावा केल्या. खराब फॉर्ममुळे शेफालीला संघातून वगळण्यात आले होते. त्यानंतर तिला विश्वचषकाच्या संघातूनही वगळण्यात आले. इकतेच तिच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला, त्यामुळे ती खूप दुःखी झाली. इतकी मोठी दु: ख असून ही शेफाली खचली नाही. कदाचित देव तिची परीक्षा घेत असावा.
जेव्हा शेफाली संघाबाहेर होती, तेव्हा तिने तिच्या वडिलांना आपल्याला संघाबाहेर करणअयात आल्यांच सांगितले नव्हते. पण एका आठवड्यानंतर त्यांना हे कळताच त्यांनी तिला थेट मैदानावर सरावासाठी पाठवले. शेवटी तिला देवानं संधी दिली. प्रतिका रावलला दुखापत झाल्याने शेफालीला उपांत्य फेरीत खेळण्यास संधी मिळाली. आज अंतिम सामन्यात शेफालीनं त्या संधीचं सोनं करत ८७ धावा केल्या.
शेफाली वर्माने ४९ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केले. जवळपास तीन वर्षांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५० धावा केल्या. शेफाली वर्मा आणि स्मृती मंधना यांनी १७.२ षटकांत पहिल्या विकेटसाठी १०० धावा जोडल्या आहेत. हे दोन्ही फलंदाज एक मजबूत भागीदारी केली होती. स्मृतीनंतर शेफाली २८ व्या षटकात बाद झाली. भारतीय संघ १६६ धावांवर असताना तिची विकेट पडली. शेफाली वर्माने ७८ चेंडूत ८७ धावा करून बाद झाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.