

स्मृती मंधनानं २१ धावा करताच मिताली राजचा मोठा विक्रम मोडला.
अंतिम सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेला.
स्मृती मंधनानं ४५ धावांची दमदार खेळी केली
आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चा अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांत होतोय. नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे हा अंतिम सामना खेळला जातोय. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाची कर्णधार लॉरा वोल्वार्डने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
भारतीय महिला संघाची स्टार सलामीवीर फलंदाज स्मृती मंधनाने २१ वा धाव पूर्ण करताच टीम इंडियाची माजी कर्णधार मिताली राजचा मोठा विक्रम मोडला आणि तो स्वतःच्या नावावर केला. या महिला एकदिवसीय विश्वचषकात स्मृती मंधना फलंदाजीने उत्कृष्ट फॉर्ममध्ये होती. अंतिम सामन्यात स्मृती ४५ धावांवर बाद झाली. त्यावेळी संघाची धावसंख्या १०१ झाली होती.
स्मृती मंधनाने आतापर्यंत २०२५ च्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकात ४०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यात तिने भारतीय महिला खेळाडू म्हणून एका एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केलाय. यापूर्वी हा विक्रम टीम इंडियाची माजी कर्णधार मिताली राजच्या नावावर होता, तिने २०१७ च्या महिला एकदिवसीय विश्वचषकात ४०९ धावा केल्या होत्या.
तर स्मृती मंधनाने २०२५ च्या महिला एकदिवसीय विश्वचषकात आतापर्यंत ४१६ पेक्षा जास्त धावा केल्यात. या विश्वचषकात स्मृती मंधनाने टीम इंडियासाठी फलंदाजीत महत्त्वाची भूमिका बजावलीय. यात ती बहुतेक सामन्यांमध्ये सलामीला आलीय. ती जबाबदारी तिने चांगली पद्धतीने पार पाडत संघाला शानदार सुरूवात करून देते.
स्मृती मंधना - आतापर्यंत ४१६ धावा (२०२५)
मिताली राज - ४०९ धावा (२०१७)
पूनम राऊत - ३८१ धावा (२०१७)
हरमनप्रीत कौर - ३५९ धावा (२०१७)
स्मृती मानधना - ३२७ धावा (२०२२)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.