IND W vs SA W Final World Cup 2025: नवी मुंबईत पाऊस धुमाकूळ घालणार, फायनल रद्द झाली तर विश्वचषकाची ट्रॉफी कुणाला? वाचा

IND vs SA Final Weather Update: भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला विश्वचषक फायनलवर पावसाचे संकट. नवी मुंबईत वादळी पावसाचा अंदाज. सामना रद्द झाला तर काय? राखीव दिवस आणि संयुक्त विजेते नियम जाणून घ्या.
IND W vs SA W: भारतीय नारी जगात भारी!
team indiatwitter
Published On

will rain cancel india vs south africa women's world cup final : नोव्हेंबर महिना उजाडला आहे, पण राज्यात अद्याप पावसाचे सावट कायम आहे. पुढील दोन दिवस मुंबई आणि उपनगरात वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. आशातच भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर अंतिम सामना होत आहे. या सामन्यावर पावसाचे संकट ओढावले आहे. भारतीय संघ पहिल्यांदाच विश्वचषक जिंकण्यासाठी आतुर आहे, पण पावसाने भंग केला तर काय? जर रविवारी पावसामुळे सामना रद्द झाला तर काय? अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे का?

फायनलमध्ये पाऊस पडला तर विश्वचषक कुणाकडे? (Ind vs SA Final Navi Mumbai Weather Forecast )

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आज महिला वनडे विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. दुपारी तीन वाजता सामन्याला सुरूवात होणार आहे. मागील काही दिवसांपासून मुंबई आणि उपनगरात पावसाने हाहाकार माजवला आहे. सामन्यावर पावसाचे सावट आले. फायनलसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे, पण त्या दिवशीही पावसाचे संकट कायम आहे. दोन्ही दिवशी सामना झाला नाही, तर विश्वचषक कुणाला मिळणार?

IND W vs SA W: भारतीय नारी जगात भारी!
India Likely XI: संजू सॅमसन OUT, हर्षितचाही पत्ता कट होणार, प्लेईंग ११ मध्ये ३ बदलाची शक्यता

एक्यु वेदरच्या रिपोर्ट्सनुसार, नवी मुंबईमध्ये आज पावसाची शक्यता जास्त वर्तवण्यात आली आहे. दुपारी तीन वाजण्याच्या आसपास नवी मुंबईत 63 टक्के पावसाचा अंदाज आहे, तर संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत ५० टक्के पाऊसाची शक्यता आहे. राखीव दिवशी, म्हणजेच सोमवारीही नवी मुंबईत ५५ टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, भारत आणि बांग्लादेश यांच्यामध्ये याच मैदानावर झालेला साखळी सामना पावसामुळे रद्द झाला होता. दरम्यान, रविवारी आणि सोमवारी दोन्ही दिवस पावसामुळे सामना पूर्ण झाला नाही, तर भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांना संयुक्त विजेते (Joint Winners) घोषित करण्यात येईल.

IND W vs SA W: भारतीय नारी जगात भारी!
INDW vs RSAW Final : विश्व कप जिंकल्यानंतर टीम इंडियावर पैशांचा पाऊस, एका खेळाडूच्या वाट्याला येणार इतकी रक्कम

भारताची संभाव्य Playing XI:

स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमनजोत कौर, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), स्नेह राणा/राधा यादव, क्रांती गौड, श्रीचरणी, रेणुका ठाकूर

दक्षिण आफ्रिकेची संभाव्य Playing XI:

लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, सुने लुस, अनेके बॉश/मसाबता क्लास, ॲनेरी डेर्कसेन, मारिझान कॅप, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), क्लो ट्रायॉन, नदिन डी क्लर्क, अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको मलाबा

IND W vs SA W: भारतीय नारी जगात भारी!
एकनाथ शिंदेंचा ZP मध्ये पवारांना धक्का, २ दिग्गजांसह सरपंचाने साथ सोडली, शिवसेनेत केला प्रवेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com