फय्याज शेख, शहापूर प्रतिनिधी
Sharad Pawar setback in Thane : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसले ठाणे ग्रामीणमध्ये जोरदार धक्का बसला आहे. ठाणे जिल्हा परिषद माजी कृषी सभापती आणि पंचायत समितीचे माजी सभापती यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. त्यांनी शुक्रवारी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या तोंडावर हा ठाण्यात पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जातोय.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर शहापूर तालुक्यात शरद पवारांना धक्का बसला आहे. ठाणे जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादीचे माजी कृषी सभापती संजय निमसे आणि शहापूर पंचायत समितीचे माजी सभापती यांच्यासह काही सरपंच व उपसरपंच यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेना नेते प्रकाश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पक्ष प्रवेश झाला. यामुळे शहापूरमध्ये शिंदे गटाची ताकद वाढली आहे.
महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समितीची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्ष आपली ताकद वाढवत आहेत. त्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न सुरू आहेत. काही पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. असे असताना निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ठाणे जिल्हा परिषद माजी कृषी सभापती संजय निमसे व पंचायत समिती सभापती तसेच काही ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांचा प्रवेश होणे, म्हणजे शहापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची ताकद कमी होताना दिसत आहे. यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला याचा मोठा फटाका बसणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.