

शेफाली वर्माने २१ वर्षे २७८ दिवसांच्या वयात इतिहास रचला आहे.
शेफालीने वीरेंद्र सहवाग आणि पूनम राऊत यांच्या रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवलं.
डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात शेफालीनं उत्कृष्ट फलंदाजी केली आहे.
टीम इंडियाची युवा सलामीवीर शेफाली वर्माने आयसीसी महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शानदार अर्धशतक झळकावले. वर्ल्ड कपच्या संघात निवड न झालेल्या शेफालीला प्रतीका रावलच्या दुखापतीमुळे उपांत्य फेरीपूर्वी अनपेक्षितपणे संघात स्थान देण्यात आले. त्या संधीचे सोने करत तिने धमाकेदार फलंदाजी करत वर्ल्ड कपमध्ये विक्रम केलाय. ही कामगिरी करणारी ती सर्वात तरुण फलंदाज ठरलीय. मात्र शेफाली शतक करण्यापासून हुकली.
नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर नाणेफेक गमावल्यानंतर टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या सुरुवातीला पाऊस झाल्याने प्रथम फलंदाजी करणे कठीण झालं होतं. मात्र शेफालीने क्रीजवर पाऊल ठेवताच ही भीती खोटी ठरवली. सेमीफायनलमध्ये फक्त १० धावांवर बाद झालेल्या शेफालीने यावेळी आक्रमक फलंदाजी करत फक्त ४९ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलंय.
हे अर्धशतक शेफालीसाठी खूप खास होते, कारण या अर्धशतकासाठी तिला तीन वर्षे वाट पाहावी लागली. एकदिवसीय क्रिकेटमध्य ऑऊट ऑफ फॉर्म असणाऱ्या शेफालीने तीन वर्षांहून अधिक काळानंतर या फॉरमॅटमध्ये अर्धशतक झळकावलं. तिचे शेवटचे अर्धशतक जुलै २०२२ मध्ये झाले होते. त्यानंतर शेफालीने फक्त एकदाच ४० धावा केल्या होत्या. आणि ३ वर्षानंतर अर्धशतक बनवलं, हे तिच्या कारकिर्दीतील पाचवे अर्धशतक होते.
या अर्धशतकासह शेफालीने वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्याच्या इतिहासात अनोखा विक्रम केलाय. वर्ल्ड कपमध्ये अर्धशतक झळकावणारी सर्वात तरुण फलंदाज ठरली. तिने केवळ २१ वर्षे आणि २७८ दिवसांच्या वयात हा विश्वविक्रम केलाय. वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात अर्धशतक झळकावणारी ती तिसरी भारतीय सलामीवीर ठरली. २००३ च्या पुरुष विश्वचषकात वीरेंद्र सेहवागने हा पहिला अर्धशतक केले होते. त्यानंतर पूनम राऊतनेही २०१७ च्या महिला विश्वचषकात अर्धशतक झळकावले. आता शेफालीचे नावही या यादीत जोडले गेले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.