Rohit Sharma : मोठी बातमी ! रोहित शर्मा कर्णधार होणार; 'दुर्लक्षित' फलंदाजाला मिळू शकते टीम इंडियात संधी

Rohit Sharma may ODI Captain : भारतीय क्रिकेट, विशेषतः रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी सुखद आणि तितकीच आश्चर्याचा धक्का देणारी बातमी आहे. रोहित शर्मा हा पुन्हा वनडे संघाचा कर्णधार होण्याची शक्यता आहे.
Rohit Sharma may ODI Captain
Rohit Sharma may ODI Captainsaam tv
Published On
Summary
  • रोहित शर्मा पुन्हा कर्णधार होण्याची शक्यता

  • टीम इंडियाचं नेतृत्व सोपवण्याचा विचार

  • ऋतुराज गायकवाड यालाही संधी देण्याची शक्यता

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. पहिल्या कसोटी सामन्यात स्टार फलंदाज आणि कर्णधार शुभमन गिल याला दुखापत झाली. त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. त्यामुळं कदाचित दक्षिण आफ्रिकाविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेत तो खेळू शकणार नाही. नियमित कर्णधार गिलच्या अनुपस्थितीत रोहित शर्माकडं पुन्हा संघाचं नेतृत्व दिलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं नवख्या संघाला अनुभवाची जोड मिळेल, असं मानलं जातंय.

कर्णधार शुभमन गिल याच्या मानेला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला कोलकाता येथील रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. पण दुखापतीतून सावरण्यास कदाचित वेळ लागू शकतो. त्यामुळं तो वनडे मालिका खेळू शकणार नाही, अशी चिन्हे दिसत आहे. त्याचवेळी रोहित शर्माच्या नेतृत्वात या मालिकेत युवा आणि अनुभवी खेळांडूंच्या संतुलित मिश्रणावर भर देण्यावर निवड समिती विचार करत आहे, असे सांगितले जाते. त्यामुळं अलिकडेच मायदेशात आणि विदेशात झालेल्या मालिकांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना १५ सदस्यीय संघात स्थान दिलं जाऊ शकतं.

वनडे मालिकेसाठी रोहित शर्माकडे पुन्हा नेतृत्व?

भारतीय वनडे संघाचा नियमित कर्णधार शुभमन गिल दुखापतीमुळं दक्षिण आफ्रिकाविरुद्ध वनडे मालिकेत खेळू शकणार नाही, असं वृत्त आहे. त्यामुळं आगामी काळात होणाऱ्या महत्वाच्या स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर संभाव्य रणनीतीच्या दृष्टीनं भारताची नवीन टीम या मालिकेत उतरवली जाऊ शकते. निवड समिती प्रमुख अजित आगरकर आणि व्यवस्थापन अनेक बदल करण्याबाबत विचार करत असल्याचं वृत्त आहे. गिलची अनुपस्थिती भरून काढायची म्हणून नव्हे तर बीझी शेड्युलमुळं ढासळणारं संघाचं नियोजन आणखी व्यवस्थित करण्यावर भर दिला जाणार आहे, असं कळतं.

शुभमन गिलऐवजी ऋतुराज गायकवाडला मिळू शकते संधी

चांगला फॉर्म असूनही दुर्लक्षित राहिलेला खेळाडू म्हणजे ऋतुराज गायकवाड. सध्या तो चांगल्या फॉर्मात आहे. अलीकडेच त्यानं दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध वनडे मालिकेत एक शतक आणि एक अर्धशतक ठोकलं आहे. त्याचा फॉर्म बघता आघाडीच्या फळीत गिलच्या जागी त्याला संधी मिळू शकते. रोहित शर्मा याच्यासोबत तो सलामीला येऊ शकतो. त्यामुळं त्याच्याकडं पर्याय म्हणून बघितलं जात आहे.

त्याचवेळी वेगवान गोलंदाजी आणि फलंदाजीही करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूंना घेऊन संघ भक्कम करण्यावर भर दिला जात आहे. हार्दिक पंड्याची निवड निश्चित मानली जात आहे. तर त्याच्या सोबत नितीश कुमार रेड्डी यालाही संघात स्थान दिलं जाऊ शकतं. भारतीय संघाची मधली फळी आणि वेगवान गोलंदाजी मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे मानले जात आहे.

यशस्वी जयस्वाल हा आघाडीच्या फळीतला फलंदाज असू शकतो. तर केएल राहुल याच्याकडं मधल्या फळीतील फलंदाज आणि बॅकअप म्हणून विकेटकीपर-फलंदाज म्हणून बघितलं जात आहे. दुसरीकडं गोलंदाजी युनिटही मजबूत स्थितीत आहे. कुलदीप यादव लग्नसोहळ्यामुळं या मालिकेतून बाहेर होऊ शकतो. त्यावेळी फिरकीचं जाळं मजबूत करण्यासाठी रविंद्र जडेजावर भरवसा दाखवला जाऊ शकतो.

जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग ही वेगवान गोलंदाजांचं त्रिकुट वनडे संघात असेल. अक्षर पटेल हा फिरकीपटू आणि कुठल्याही क्रमांकावर फलंदाजी करणारा खेळाडू आहे. त्यामुळं भारताकडं ऑलराउंडर म्हणून अनेक पर्याय उपलब्ध आहेत. वरुण चक्रवर्ती देखील महत्वाचा खेळाडू आहे. त्याची जादुई फिरकी स्लो पिचवर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना गिरकी घ्यायला लावू शकतो. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी बीसीसीआयनं अद्याप संघ आणि नेतृत्वाची अधिकृत घोषणा केलेली नाही. वरील सर्व माहिती ही मीडिया रिपोर्ट्स आणि त्यांच्या सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आली आहे.

Rohit Sharma may ODI Captain
Shubman Gill: चौकार लगावल्यानंतर शुभमन गिलच्या मानेत का झाल्या तीव्र वेदना? ही परिस्थिती किती असू शकते गंभीर?

वनडे मालिकेसाठी संभाव्य भारतीय संघ -

रोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, केएल राहुल, ध्रुव जुरेल, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती, नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा.

Rohit Sharma may ODI Captain
Team India: गंभीर-गिलमध्ये वादाची ठिणगी? टीम इंडियातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; मतभेदांचं कारण चर्चेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com