Shubman Gill: चौकार लगावल्यानंतर शुभमन गिलच्या मानेत का झाल्या तीव्र वेदना? ही परिस्थिती कितीपत असते गंभीर?

Shubman Gill neck injury: गिलला ही दुखापत एका सामान्य शॉटनंतर झाली, ज्यामुळे क्रिकेट चाहते आश्चर्यचकित झाले. या वेदनेमागे नेमके काय कारण होते आणि ही स्थिती किती गंभीर आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
Shubman Gill neck injury
Shubman Gill neck injurysaam tv
Published On

दक्षिण आफ्रिका विरूद्ध भारत यांच्यात झालेल्या पहिल्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल दुसऱ्या डावात खेळू शकला नाही. पहिल्या डावात फलंदाजी करताना शुभमन गिलला स्वीप शॉटनंतर लगेचच मानेला तीव्र ताण आला.

वॉशिंग्टन सुंदर बाद झाल्यानंतर गिल 35व्या ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी आला आणि येताच एक जबरदस्त स्वीप मारून चौकार मिळवला. पण त्या फटक्यानंतर त्याला अचानक तीव्र वेदना जाणवली आणि मान पकडत तो रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला.

बीसीसीआयने सांगितलं की, गिलला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. यानंतर तो पहिल्या टेस्टमधून बाहेर झाला. दरम्यान चौकारानंतर गिलच्या खांद्यात एवढी तीव्र वेदना का झाली आणि ही स्थिती किती धोकादायक असू शकते हे आपण जाणून घेऊया.

Shubman Gill neck injury
Shubman Gill: टीम इंडियाला मोठा धक्का! कोलकाता टेस्टमधून शुभमन गिल बाहेर; 'या' खेळाडूकडे कर्णधारपदाची धुरा

शुभमनला नेमकी काय समस्या झाली?

मिळालेल्या माहितीनुसार, शुभमन गिलला उपचारासाठी ICU मध्ये हलवण्यात आलं होतं. ज्या ठिकाणी वैद्यकीय टीम सतत त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होती. स्कॅन आणि MRI च्या सर्व तपासण्या पूर्ण झाल्या आहेत. भारतीय कर्णधाराला मानेजवळ तीव्र वेदना जाणवत होती, त्यामुळे त्याला उपचांरासाठी ICU मध्ये दाखल करण्यात आलं. चांगली बाब म्हणजे प्राथमिक अहवालांमध्ये त्याच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येतेय.

काही माध्यमांच्या माहितीनुसार, शुभमन गिलला मानेला स्पॅझम झाला आहे, ज्यामुळे त्याला श्वास घेणं आणि शरीर हलवणं यात अडचण होत आहे. त्याला देखरेखीसाठी वुडलँड्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे.

मानेला आलेला ताण किती धोकादायक?

Mayo Clinic च्या माहितीनुसार, अचानक होणारा मानदुखीचा त्रास बहुधा स्नायूंवर ताण, चुकीच्या हालचाली किंवा नसांवर दबाव यामुळे होतो. शुभमन गिलच्या बाबतीतही अशीच परिस्थिती उद्भवली होती. स्वीप शॉट मारताना त्याच्या शरीराचा वरचा भाग जोरात फिरला, ज्यामुळे मानेला असलेल्या स्नायूंवर अचानक ताण आला आणि स्पॅझमची स्थिती निर्माण झाली. त्यामुळेच चौकारानंतर त्याला तीव्र वेदना जाणवली आणि तो रिटायर्ड हर्ट झाला.

Shubman Gill neck injury
Heart cancer: होय, हृदयाचा कॅन्सरही होऊ शकतो; कोणाला असतो जास्त धोका? वाचा

वैद्यकीय अहवाल सांगतात की, मानेला अचानक आलेला ताण साधारणपणे हलका असतो, पण कधी कधी तो नसांवर दबाव, पेशींना इजा किंवा सर्व्हायकल स्पाईनवर ताण निर्माण करू शकतो. अशा वेळी वेदना तीव्र होऊ शकते आणि काहीवेळा रूग्णांना डोकं हलवणं कठीण होऊ शकतं. म्हणूनच खेळाडूंमध्ये अशा वेदनांकडे दुर्लक्ष केले जात नाही आणि तातडीने स्कॅन करण्याचा सल्ला दिला जातो.

Shubman Gill neck injury
Ensure Diabetes Care: डायबिटीज मॅनेजमेंटसाठी प्रगत उपाय! एन्‍शुअर डायबिटीज केअरमुळे होऊ शकतो मोठा फायदा

कधी ही समस्या गंभीर ठरू शकते?

Mayo Clinic च्या माहितीनुसार, साधारणपणे हा त्रास काही दिवसांत उपचारानंतर ठीक होतो. पण जर ताण-वेदनेसह काही लक्षणं दिसली तर सावधगिरी बाळगणे आवश्यक असते.

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये-

  • वेदना सतत राहणं किंवा काही दिवसांत कमी न होणं

  • वेदनेसह हात, खांद्यात कमजोरी, सुन्नपणा किंवा झिणझिण्या जाणवणं

Shubman Gill neck injury
India diabetes cases: भारतात मधुमेहाची वाढती संख्या! धक्कादायक आकडवेवारी समोर; ५०% लोकांना तर आजार असल्याचंही माहित नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com