

अॅबॉट ही जागतिक आरोग्य सेवा कंपनी आज ‘एन्शुअर डायबिटीज केअर’च्या नवीन आणि प्रगत सूत्रीकरणाचं लाँच करत आहे. गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ वैज्ञानिक पोषण क्षेत्रात काम करून आणि ६० पेक्षा जास्त वैद्यकीय चाचण्यांच्या आधारावर तयार झालेलं हे नवीन सूत्र मधुमेह असलेल्या लोकांना अधिक चांगलं जीवन जगायला मदत करणार आहे.
या सूत्रीकरणात ट्रिपल केअर सिस्टीमसह महत्त्वाचे पोषक घटक आहेत. यात ४ पट जास्त मायो-इनोसिटॉल आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले कार्बोहायड्रेट्स आहेत, जे हळूहळू ऊर्जा देतात आणि रक्तातील साखर अचानक वाढू नये यासाठी डिझाइन केलेले आहेत.
उच्च दर्जाचे प्रोटीन आणि फायबर यामुळे रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवायला. कोलेस्टेरॉल कमी करायला आणि वजन व्यवस्थित सांभाळायला मदत होते. वजन कमी होत असताना स्नायूंचं संरक्षण होतं, शरीरातील चरबी कमी होते आणि यकृत व स्वादुपिंडासारख्या अवयवांभोवती साठलेली धोकादायक व्हिसेरल फॅटही कमी होतं. हे फॅट्स हृदयविकार, टाइप २ मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांना कारणीभूत ठरतात.
आज जगभरात मधुमेह झपाट्याने वाढत आहे. सध्या ५८९ दशलक्ष प्रौढ लोक मधुमेहासह जगत आहेत आणि ही संख्या २०५० पर्यंत ८५३ दशलक्षपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. भारतात १०१ दशलक्ष लोक मधुमेहासह जगत आहेत आणि त्यामुळे भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. योग्य उपाययोजना आणि पोषणावर लक्ष केंद्रित केल्यास हा भार कमी करता येऊ शकतो.
मधुमेह व्यवस्थापनात पोषण आणि ग्लायसेमिक नियंत्रण खूप महत्त्वाचे असतात. ग्लायसेमिक नियंत्रण म्हणजे रक्तातील ग्लुकोज आरोग्यदायी पातळीवर ठेवणं. पण चारपैकी तीन मधुमेह असलेल्या लोकांमध्ये चुकीच्या आहाराच्या सवयी, अनुवांशिक कारणं आणि जीवनशैलीमुळे ग्लायसेमिक नियंत्रण कमी असतं.
अॅबॉटच्या आशिया-पॅसिफिक न्यूट्रिशन आरअँडडी सेंटरमधील वैद्यकीय विज्ञान आणि पोषण विभागाच्या वरिष्ठ प्रमुख डॉ. अॅग्नेस सिव लिंग टे म्हणाल्या, “मधुमेहाशी संबंधित पोषण सूत्रं हे मधुमेह मॅनेजमेंटचं मुख्य साधन आहे. वैज्ञानिक पुराव्यांनुसार, ही सूत्रं ग्लायसेमिक नियंत्रण सुधारतात, हृदयाशी संबंधित जोखीम कमी करतात आणि वजन नियंत्रणात मदत करतात. जीवनशैलीत बदल करताना ही सूत्रं दीर्घकाळ आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी प्रभावी ठरतात.”
त्या पुढे म्हणाल्या, “मधुमेह व्यवस्थापनासाठी योग्य पोषण योजना स्वीकारणं हे जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी महत्त्वाचं आहे, पण ते सोपं नाही. एन्शुअर डायबिटीज केअरचं नवीन सूत्र विज्ञानावर आधारित आणि सोपं उपाय आहे. जे मधुमेह असलेल्या लोकांना त्यांची जीवनशैली बदलायला आणि आरोग्यावर नियंत्रण ठेवायला मदत करतं.”
नवीन एन्शुअर डायबिटीज केअर सूत्रीकरणात मधुमेह व्यवस्थापनासाठी खास तयार केलेले घटक आहेत. यात हळूहळू पचणारे कार्बोहायड्रेट्स आणि ४ पट जास्त इनोसिटॉल आहे, जे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतात. विरघळणारे आणि न विरघळणारे फायबर यांचं संयोजन आहे, जे पचनसंस्थेचं आरोग्य सुधारतं. प्रीबायोटिक एफओएस आहे, जे चांगल्या जीवाणूंची वाढ करतात आणि पचनसंस्थेला मदत करतात. यात कोलेस्ट्रॉल कमी करणारे फॅट्स आहेत, जे हृदयाचं आरोग्य सुधारतात आणि यात ट्रान्स-फॅट नाही.
हे सूत्र आवश्यक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स पुरवतं. यात जास्त प्रमाणात व्हिटॅमिन डी, क्रोमियम, कॅल्शियम आणि झिंक आहे, जे मधुमेह असलेल्या लोकांच्या पोषण गरजा पूर्ण करतात. यात सुक्रोज नाही आणि प्रथिने व फायबर जास्त प्रमाणात आहेत.
भारतातील अॅबॉटच्या पोषण व्यवसायाचे महाव्यवस्थापक अनिर्बन बासू म्हणाले, “भारत आणि जगभरातील लाखो लोकांच्या जीवनावर मधुमेहाचा परिणाम होत आहे. अशा वेळी लोकांना त्यांच्या आरोग्यावर नियंत्रण ठेवायला मदत करणारे उपाय खूप महत्त्वाचे आहेत. अॅबॉटचं नवीन एन्शुअर डायबिटीज केअर सूत्र विज्ञानावर आधारित पोषण पुढे नेण्याचं उदाहरण आहे. हे सूत्र ग्लायसेमिक नियंत्रण आणि एकूण आरोग्य सुधारायला मदत करतं. लक्ष्यित पोषक घटक आणि वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित घटक एकत्र करून ही नाविन्यपूर्ण योजना मधुमेह असलेल्या लोकांना आरोग्यदायी आणि सक्रिय जीवन जगायला मदत करणारं महत्त्वाचं पाऊल आहे.”
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.