Lifestyle: हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्यामागे आपल्या 'या' घाणेरड्या सवयी कारणीभूत; धोका कोणाला जास्त?

Heart attack and stroke risk factors: जगातील सर्वाधिक मृत्यू हृदयविकार आणि स्ट्रोकमुळे होतात. धक्कादायक बाब म्हणजे, पूर्वी केवळ वृद्धांमध्ये दिसणारे हे आजार आता तरुण आणि मध्यमवयीन लोकांनाही मोठ्या प्रमाणात होत आहेत.
Four major heart disease risk factors
Four major heart disease risk factorssaam tv
Published On
Summary
  • हार्ट अटॅक अचानक होत नाही

  • 99% रुग्णांमध्ये धोका घटक होते

  • धूम्रपान, कोलेस्ट्रॉल, साखर वाढवतात धोका

आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं की, हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक या परिस्थिती अचानक उद्भवतात. मात्र खरी स्थिती यापेक्षा काहीशी वेगळी असते. नुकतंच अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डियोलॉजीच्या जर्नलमध्ये प्रकाशित एका मोठ्या संशोधनानुसार, हृदयविकार आणि मेंदूच्या स्ट्रोकची घटना अचानक होत नाही तर ती आपल्या जीवनशैलीतील चुका आणि सवयींचा परिणाम असतो.

Four major heart disease risk factors
Symptoms of heart attack in kids: लहान मुलांमध्ये हार्ट अटॅक येण्यापूर्वी दिसतात 'ही' 5 लक्षणं; पालकांनी दुर्लक्ष करू नये

या अभ्यासामध्ये कोरियातील ६ लाखांहून अधिक लोक आणि अमेरिकेतील १२०० पेक्षा जास्त रुग्णांचा डेटा पाहिला गेला. संशोधनाचे निष्कर्ष आश्चर्यकारक होते. ९९ टक्के रुग्णांमध्ये हृदयविकार किंवा स्ट्रोक होण्यापूर्वी किमान एक मोठा धोका घटक अस्तित्वात होता. म्हणजेच, योग्य काळात या धोका घटकांची ओळख करून आपण आपल्या हृदय आणि मेंदूची काळजी घेऊ शकतो.

हृदयविकार आणि स्ट्रोक होण्याची मुख्य कारणे

उच्च रक्तदाब

अभ्यासानुसार, ९६ टक्के रुग्णांमध्ये रक्तदाब जास्त होता. उच्च रक्तदाब म्हणजे एक 'साइलेंट किलर', जो लक्षणांशिवाय हळूहळू शरीरातील महत्वाच्या अवयवांवर, विशेषतः हृदय आणि मेंदूत परिणाम करतो. त्यामुळे हृदयाच्या स्नायूंवर अधिक ताण येतो आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.

यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मीठाचं सेवन कमी करा, रोज किमान ३० मिनिट चालणं किंवा हलका व्यायाम करा, ताण-तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा आणि नियमित रक्तदाब तपासणी करीत राहा.

Four major heart disease risk factors
Early signs of heart disease: शरीरात दिसणारे 'हे' ८ बदल वेळीच ओळखा; हृदयाच्या आजारांचा धोका दर्शवतात लक्षणं, दुर्लक्ष नकोच!

धूम्रपान

संशोधनानुसार ६८ टक्के रुग्ण धूम्रपान करणारे होते. सिगारेटमधील रसायने धमनींना घट्ट करतात, ज्यामुळे रक्तप्रवाह आणि ऑक्सिजन पुरवठा कमी होतो. हृदयाला आवश्यक ऑक्सिजन न मिळाल्यामुळे धोका हळूहळू वाढतो. बचावासाठी तातडीने धूम्रपान सोडा, घरात धूम्रपान करणाऱ्यांपासून दूर रहा, आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार निकोटीन रिप्लेसमेंट थेरेपी वापरा.

Four major heart disease risk factors
Heart attack: हार्ट अटॅक येण्याच्या काही दिवस अगोदर शरीरात दिसतात 'ही' लक्षणं; सामान्य समजून दुर्लक्ष करू नका

उच्च कोलेस्ट्रॉल

कोलेस्ट्रॉल जास्त झाल्यास रक्तवाहिन्यांच्या आतील भिंतींवर प्लॅक जमा होतो. हा प्लॅक नंतर ब्लॉकेज तयार करतात, जे हृदयविकार किंवा स्ट्रोकचं कारण ठरतात. शरीरात चांगला कोलेस्ट्रॉलही असतो, जो धमनी साफ ठेवतो. पण संतुलन बिघडल्यास धोका वाढतो. यासाठी फास्ट फूड, तळलेले पदार्थ, ट्रान्स फॅट टाळा, ओमेगा-३ असलेले अन्न खा आणि नियमित ब्लड टेस्ट करा.

Four major heart disease risk factors
Spine surgery: मणक्याच्या शस्त्रक्रियेला घाबरुन जाऊ नका; भिती कमी करण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

महिलांमध्ये धोका वाढत आहे

पूर्वी असं मानलं जात होतं की, महिलांना ६० वर्षांपूर्वी हृदयविकाराचा धोका कमी असतो. परंतु या स्टडीनुसार, ६० वर्षांखालील महिलांमध्येही ९५ टक्क्यांहून अधिक रुग्णांमध्ये कोणताही रिस्क फॅक्टर आढळला आहे. हार्मोनल बदल, ताण-तणाव आणि अस्वस्थ आहारामुळे महिलांमध्ये धोका जलद वाढतो. त्यामुळे पिरियड्स आणि मेनोपॉजच्या काळात हार्मोनल तपासणी करा, मेडिटेशन आणि हेल्दी लाइफस्टाइल पाळा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com