सध्या तरुणांपासून अगदी ४० ते ५० वर्षांतील व्यक्तींमध्ये अंगावर टॅटू काढण्याचे प्रमाण वाढले आहे. हातांवर आणि पायांवर टॅटू काढण्याचे सध्या एक वेगळेच ट्रेंड सुरू असल्याचे दिसत आहे. काही व्यक्ती फक्त हात आणि पाय यांवर नाही तर अगदी तोंडावर सुद्धा विविध पद्धतीचे टॅटू कोरून घेतात. मात्र टॅटूमुळे आपल्याला कर्करोग होण्याची शक्यता असल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे.
टॅटूमुळे कर्करोगाचा धोका जास्त प्रमाणात वाढतो. तसेच त्वचेशी संबंधित गंभीर समस्या निर्माण होतात, असं एका अभ्यासात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळीच सावध व्हावे असा सल्ला सुद्धा अभ्यासकांनी दिला आहे.
टॅटूमुळे कोणता कर्करोग होतो?
वारंवार शरीरावर टॅटू काढल्याने त्यातील शाई आपल्या रक्तात मिसळते. त्यामुळे रक्ताचा कर्करोग होतो, असं अभ्यासकांनी म्हटलं आहे. कारण या शाईमध्ये जड धातू आणि अन्य हानिकारक रसायने असतात. याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होण्याची शक्यता असते. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर टॅटू काढला जातो तेव्हा ती जागा सुजते. टॅटूची जखम लवकर बरी झाली नाही तर त्याचा त्रास पुढे कर्करोगापर्यंत पोहचण्याची शक्यता असते.
टॅटूमुळे होणाऱ्या अन्य समस्या
टॅटूमुळे फक्त कर्करोग नाही तर त्वचेशी संबंधित अन्य बऱ्याच समस्या उद्भवतात. टॅटू काढताना सतत एकच सुई वापरली की, त्याने एचआयव्ही सारखा जीवघेणा आजार उद्भवण्याची शक्यता असते. तसेच टॅटू काढताना वापरी जाणारी उपकरणे अस्वच्छ असल्यास त्याने हेपेटायटीस बी आणि हेपेटायटीस सी सारख्या अडचणीही उद्भवतात.
टॅटू काढताना आणि काढल्यानंतर ही काळजी घ्या
टॅटू काढताना संबंधित व्यक्तीने योग्य पद्धतीने सर्व स्वच्छ उपकरणे वापरली पाहिजेत.
टॅटू काढताना एका व्यक्तीसाठी वापरलेली सुई दुसऱ्या व्यक्तीसाठी वापरू नका.
टॅटू काढल्यानंतर ती जखम लवकर कशी बरी होईल याकडे लक्ष द्या.
जखम बरी होत नसेल तर त्यावर डॉक्टरांकडून योग्य तो उपचार घ्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.