Lung Cancer
World Lung Cancer Day 2024Saam TV

World Lung Cancer Day 2024 : बापरे! तुमत्या शरीरात सुद्धा 'हे' बदल जाणवत आहेत? असू शकतो Lungs शी संबंधीत आजार

Lung Cancer : सिगारेटमुळे व्यक्तीचे फुप्फुस खराब होते. काही काळानंतर कॅन्सर असल्याचे निदान होते. त्यामुळे आज Lungs कॅन्सरची लक्षणे नेमकी काय आहेत? त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
Published on

बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक व्यक्ती विविध व्यसनांच्या आहारी चालले आहेत. शरीरातील पेशी अनियंत्रीत झाल्यास त्याने शरीरात गाठी तयार होतात. या गाठी पुढे कॅन्सरच्या असल्याचे समजते. कामाच्या ओघात रिफ्रेशमेंट म्हणून कही व्यक्ती चहा पितात तर काही व्यक्ती सिगारेट ओढतात. सिगारेटमुळे व्यक्तीचे फुप्फुस खराब होते. काही काळानंतर कॅन्सर असल्याचे निदान होते.

Lung Cancer
Lungs Cancer : फुफ्फुसाच्या कर्करोगाशी संबंधित असणाऱ्या या गोष्टींबद्दल माहितेय का ?

Lungs कॅन्सरच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. ज्या व्यक्तीने कधीच सिगारेट प्यायली अशा व्यक्तीला देखील Lungs कॅन्सर होत आहे. ज्या व्यक्ती कोणतंही व्यसन करत नाहीत त्यांना सुद्धा कॅन्सर होतो. मात्र आपल्याला कॅन्सर असल्याचं त्यांना पटकन लक्षात येत नाही. साध्या साध्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने आजार वाढतो आणि त्या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे आज Lungs कॅन्सरची लक्षणे नेमकी काय आहेत? त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

या लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका

खोकला -बऱ्याच दिवसांपासून खोकला सुरू आहे आणि कितीही औषधे घेतली तरी खोकला बरा होत नाही.

खोकताना गळा दुखणे आणि अचानक रक्त येणे

छोटी-मोठी कामे केली तर जास्त धाप लागणे

धातीत दुखू लागणे

काही कारण नसताना सतत वजन कमी होत जाणे

शरीरातील हाडे दुखण्यास सुरुवात होणे

सतत डोकं दुखत राहणे

या काही साध्या मात्र गंभीर समस्या आहेत. काही कारण नसताना आपलं वजन अचानक कमी होऊ लागलं की आपल्याला बारीक झाल्याचा आनंद होतो. मात्र यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. सतत डोके दुखत असल्यास अनेक व्यक्ती ही सामान्य समस्या समजून त्याकडे दुर्लक्ष करतात हे देखील चूक आहे.

Lungs कॅन्सर स्टेजनुसार जाणून घ्या

0 स्टेज

तुम्हाला कॅन्सरची लागण झालीये मात्र कॅन्सर सध्या 0 स्टेजला असेल तर शरीरात फक्त गाठ येते. असे असताना कॅन्सर सेल्स फुप्फुसांमध्ये आतपर्यंत गेलेले नसतात. ते फुप्फुसांच्या बाहेरच असतात.

स्टेज १

या स्टेजला कॅन्सर फुप्फुसांच्या आत जाण्यास सुरुवात होते.

स्टेज २

स्टेज २ मध्ये व्यक्तीचा त्रास वाढतो आणि फुफ्फुसाजवळील लिम्फ नोड्समध्ये कॅन्सर पसरतो.

स्टेज ३

स्टेज ३ मध्ये कॅन्सर फुफ्फुसाजवळील नोड्समध्ये पसरतो आणि संपूर्ण शरीरात कॅन्सर पसरण्यास सुरुवात झालेली असते.

Lung Cancer
Air Pollution Affect Lung Cancer : फुफ्फुसाचा कर्करोग असणाऱ्यांना वाढत्या प्रदूषणाचा धोका! कशी घ्याल काळजी?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com