Cancer Medicine : भारतीय मसाले करणार कॅन्सरवर मात...; संशोधनात समोर आली आश्चर्यकारक माहिती

IIT Madras Researchers Patent : भारतीय मसाल्यांपासून तयार होणारी औषधे फुप्फुस, स्तन, तोंड, मोठे आतडे, गर्भाशय, थायरॉइड अशा कर्करोगांवर चांगल्या पद्धतीने मात करू शकतात.
Cancer Medicine
Cancer MedicineSaam TV
Published On

Cancer News:

कर्करोग हा असा अजार आहे ज्याने आजवर अनेकांचा मृत्यू झालाय. कॅन्सरवर अजूनही ठोस औषध बनलेलं नाही. कॅन्सर झालेली व्यक्ती काही ठरावीक काळच जगू शकते. या रोगावर मात मिळवण्यासाठी शास्त्रज्ञांकडून शर्थिचे प्रयत्न सुरू आहेत.अशात कर्करोगावरील औषध बनवण्यासाठी भारतीय मसाले उपयुक्त असल्याची माहिती समोर आलीये.

Cancer Medicine
Medical Insurance असेल तर रुग्णालयात Cashless उपचार घेता येणार! काय आहेत नियम? #medicalinsurance

भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मद्रास येथील संशोधकांनी कर्करोगावर उपचारासाठी भारतीय मसाल्यांच्या वापराचे पेटंट मिळवले आहे. साल २०२८ पर्यंत ही औषधे बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. भारतीय मसाल्यांपासून तयार होणारी औषधे फुप्फुस, स्तन, तोंड, मोठे आतडे, गर्भाशय, थायरॉइड अशा कर्करोगांवर चांगल्या पद्धतीने मात करू शकतात.

दालचीनी, हळद, तेजपत्ता, लवंग, हिंग, वेलची असे विविध भारतीय मसाले वापरल्यास त्यापासून शरीरातील सामान्य पेशींना कोणतेही नुकसान होत नाही, असंही संशोधनात समोर आल्याचा दावा करण्यात आलाय. अद्याप या संशोधनाला सुरुवात झाली नाही. सध्या फक्त याचे पेटंट मिळाले आहे. संशोधक सध्या या कामासाठी लागणारा खर्च आणि सुरक्षिततेच्या समस्यांवर काम करत आहेत.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), मद्रास येथील संशोधकांनी भारतीय मसाल्यांच्या वापरासाठी पेटंट मिळवले आहे. हे पेटंट कॅन्सरसारख्या घातक आजारावर उपचार करण्यासाठी प्रभावी ठरू शकते. साल 2028 पर्यंत हे औषध बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

भारतातील कॅन्सर बाधितांची संख्या

जगाभरात कॅन्सर रोगाने आजवर अनेक बळी घेतले आहेत. विविध व्यसनांमुळे व्यक्ती कॅन्सर रोगाच्या शिकार होत आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार कॅन्सरमुळे साल 2020 मध्ये 1 कोटी लोकांचा मृत्यू झाला. साल २०२० मध्ये भारतात 7 लाख 70 हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 2021 मध्ये 7 लाख 79 हजार आणि 2022 मध्ये 8 लाख 8 हजार व्यक्तींचा मृत्यू झालाय.

Cancer Medicine
Cancer Prevention Tips : या सवयी आजपासून बदलाच, कर्करोगापासून राहाल दूर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com