Heart cancer: होय, हृदयाचा कॅन्सरही होऊ शकतो; कोणाला असतो जास्त धोका? वाचा

Heart cancer can occur who is at higher risk: हृदय कर्करोग हा एक अत्यंत दुर्मीळ प्रकारचा कॅन्सर आहे. हृदयाला कॅन्सर होऊ शकतो का? या प्रश्नाचे उत्तर होय असे आहे. पण तो शरीराच्या इतर भागाच्या तुलनेत अत्यंत कमी असतो.
Heart cancer can occur who is at higher risk
Heart cancer can occur who is at higher riskSAAM TV
Published On

आपल्या शरीरीरातील एक महत्त्वाचा अवयव म्हणजे हृदय. हृदयाच्या समस्या म्हटलं की, हार्ट अटॅक, हृदयाच्या नसा ब्लॉक होणं याची अनेकांना माहिती आहे. मात्र हृदयाचाही कॅन्सर होतो हे अनेकांना माहिती नसतं. हृदय हा शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव असून त्यावर कॅन्सर होतो ही गोष्ट अनेकांना अविश्वसनीय वाटते.

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, हृदयातही कॅन्सर होऊ शकतो. हा आजार प्रायमरी हार्ट कॅन्सर म्हणून ओळखला जातो. ज्यावेळी हा कॅन्सर थेट हृदयात सुरू होतो. तर दुसऱ्या अवयवातून पसरून हृदयात पोहोचल्यास त्याला सेकंडरी हार्ट कॅन्सर म्हणतात.

Heart cancer can occur who is at higher risk
Early signs of heart disease: शरीरात दिसणारे 'हे' ८ बदल वेळीच ओळखा; हृदयाच्या आजारांचा धोका दर्शवतात लक्षणं, दुर्लक्ष नकोच!

हृदयाचा कॅन्सर कसा होतो?

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, की हृदयाचा कॅन्सर बहुतेक वेळा इतर अवयवांमधून पसरतो. स्तन, अन्ननलिका, त्वचा, फुफ्फुसं, किडनी यांसारख्या अवयवांतील कॅन्सर हृदयात पोहोचू शकतो. त्याचप्रमाणे छातीतील थायमस ग्रंथी, रक्त किंवा लिम्फॅटिक सिस्टीममधील कॅन्सरही हृदयात पसरू शकतो.

काही वेळा रेडिएशन, टॉक्सिन पदार्थांचा संपर्क किंवा आनुवंशिक कारणांमुळेही हा आजार होऊ शकतो. POT1 नावाच्या जनुकातील बदलामुळे काही लोकांना हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. पालकांमध्ये हा जनुक बदल असल्यास तो मुलांमध्येही येऊ शकतो.

हृदयाचा कॅन्सर दुर्मिळ का आहे?

हृदयात मुख्यत्वे स्नायू आणि संयोजी टिश्यू असतात. हे टिश्यू फार वेगाने पुनर्निर्मित होत नाहीत. त्यामुळे त्यांचा कॅन्सर होण्याची शक्यता कमी असते. कॅन्सर पेशी वेगाने वाढणाऱ्या एपिथेलियल पेशींमध्ये जास्त प्रमाणात तयार होतात. त्यामुळे स्तन, मोठे आतडे, स्वादुपिंड, फुफ्फुसे आणि त्वचा यांसारख्या अवयवांमध्ये कॅन्सर जास्त प्रमाणात दिसतो.

Heart cancer can occur who is at higher risk
Heart attack symptoms: छातीत दुखण्याव्यतिरीक्त हार्ट अटॅकची 'ही' इतरंही लक्षणं दिसतात; रात्रीच्या वेळेस होणारे बदल पाहा

हृदयाच्या कॅन्सरची लक्षणं

  • अचानक आणि अस्पष्ट हृदयविकाराचा झटका

  • श्वास घेण्यास त्रास

  • अरिदमिया– म्हणजेच हृदयाची अनियमित गती

  • छातीत वेदना

  • बेशुद्ध पडणे

  • हृदयाभोवती अतिरिक्त द्रव साचणे

  • वजन घटणं

  • पाठीमध्ये सतत वेदना

  • खोकल्यातून रक्त येणं

  • स्मरणशक्ती कमी होणे

Heart cancer can occur who is at higher risk
Heart attack: हार्ट अटॅक येण्यापूर्वी तुमच्या पायांमध्ये दिसतात 'हे' मोठे बदल; मृत्यूचा धोका टाळण्यासाठी लक्षणं वेळीच ओळखा

उपचार शक्य आहेत का?

तज्ज्ञांच्या मते हृदयाचा कॅन्सर पूर्णपणे बरा करता येत नाही. मात्र किमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपीद्वारे ट्यूमर कमी करता येतो आणि लक्षणांवर नियंत्रण मिळवता येते. जर दुसऱ्या अवयवातील कॅन्सर हृदयात पसरला असेल, तर त्या मूळ कॅन्सरवर उपचार केले जातात.

उपचार ट्यूमरच्या आकार, स्थान, रुग्णाचं वय आणि आरोग्य यावर अवलंबून असतात. काही वेळा शस्त्रक्रियेद्वारे ट्यूमर काढून टाकला जातो, ज्यामुळे आयुष्य वाढू शकतं. मात्र ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असते आणि ती विशेष केंद्रातच केली जाते.

काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये ऑटो ट्रान्सप्लांटेशन नावाची प्रक्रिया केली जाते, ज्यात हृदय काढून त्यावर शस्त्रक्रिया करून पुन्हा बसवलं जातं. तसेच हृदय प्रत्यारोपणही काही रुग्णांसाठी पर्याय असू शकतो. तरीही सध्या हृदयाच्या कॅन्सरसाठी कायमस्वरूपी उपचार उपलब्ध नाहीत.

Heart cancer can occur who is at higher risk
Heart Attack: पायांमध्ये ही लक्षणं दिसली तर मिळतात हार्ट अटॅकचे संकेत, वेळीच बदल ओळखा

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com