

ईडन गार्डन्सवर भारत–दक्षिण आफ्रिका टेस्ट सामना
शुभमन गिल दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर
ऋषभ पंत भारताचा नवा कर्णधार ठरला
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टेस्ट सामना सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जातोय. या सामन्यात टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार शुभमन गिलला मानेला दुखापत झाल्यामुळे संपूर्ण सामन्यातून बाहेर व्हावं लागलंय.बीसीसीआयने ट्विट करत याची माहिती दिलीये.
बीसीसीआयने एक्स अकाऊंटवर ट्विट करत म्हटलंय की, शुभमन गिल आता या टेस्ट सामन्यात खेळणार नाही. सध्या तो रुग्णालयात असून बीसीसीआयची वैद्यकीय टीम त्याच्यावर लक्ष ठेवून आहे.
कोलकाता टेस्टमध्ये आता भारतासाठी ऋषभ पंत कर्णधारपद सांभाळणार आहेत. कारण पंत हा भारताच्या टेस्ट टीमचा तो उपकर्णधार आहे. कर्णधार अनुपस्थित असताना उपकर्णधारच टीमचं नेतृत्व करतो.
पहिल्या डावात शुभमन गिल फलंदाजीसाठी आला होता. मात्र, तो फक्त तीन बॉल खेळू शकला. यानंतर शुभमन रिटायर्ड हर्ट झाला. तिसऱ्या बॉलवर गिलने चौकार मारला होता. पण या चौकारानंतर त्याला मानेला वेदना जाणवू लागल्या. गिलला होणाऱ्या वेदना पाहता फिजिओ मैदानावर आले आणि गिलला बाहेर जावं लागलं. त्यानंतर गिल पहिल्या डावात पुन्हा फलंदाजीसाठी आला नाही.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने भारताविरुद्ध टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दक्षिण आफ्रिका पहिल्या डावात 159 धावांवर सर्वबाद झाली. भारतासाठी जसप्रीत बुमराहने पाच विकेट घेतल्या. त्यानंतर टीम इंडियाचा खेळही काही फारसा चांगला झाला नाही. संपूर्ण भारतीय टीमने पहिल्या डावात 189 रन्स करत 30 रन्सची आघाडी घेतली.
शुभमन गिल सामन्यातून का बाहेर पडला?
मानेला दुखापत झाल्यामुळे तो खेळू शकला नाही.
गिलच्या अनुपस्थितीत कर्णधारपद कोण सांभाळतो?
ऋषभ पंत उपकर्णधार असल्याने कर्णधारपद घेतले.
गिलला दुखापत कशी झाली
चौकारानंतर मानेला वेदना झाल्याने बाहेर गेला.
दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव किती धावांवर संपला?
दक्षिण आफ्रिका १५९ धावांवर सर्वबाद झाली.
भारताने पहिल्या डावात किती आघाडी घेतली?
भारताने ३० धावांची आघाडी घेतली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.